Video of women fighting goes viral pune
सोशल मीडियावर अलीकडे भांडणांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. कुठे बसमध्ये, तर कुठे ट्रेनमध्ये सगळीकडे सतत भांडण होताना दिसते. सध्या सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील असाच एक महिलांच्या भांडणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्याच्या लोणीकाळभोर मधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये महिला अगदी एकमेकींचे कपडे देखील फाडत आहेत. शिवाय त्यांनी थांबावयला आलेल्या पुरुषांना देखील महिलांनी सोडलेले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, महिला एकमेकींच्या झिझ्यांउपटत आहेत. एकमेकींचे कपडे फाडत आहेत. संपूर्ण भांडण अक्षरश: WWE फाईटमध्ये बदलेले आहे.काही महिला या भांडणांमध्ये जखमीही झाल्याचे व्हिडिओत दिसत आहेत. मात्र, भांडण कोणत्या कारणांवरुन झाले हे अद्याप कळालेले नाही. विशेष म्हणजे काही पुरुष भांडण थांबवण्यासाठी मधस्थी करत होते. त्यांनी देखील महिलांनी सोडलेले नाही. एका पुरुषाचा शर्ट पूर्ण फाडून टाकला आहे. आसपास अनेक जणांचा घोळका देखील पाहायला मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
पुण्यातील लोणीकाळभोर कदमवाकवस्ती येथे महिलांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, एक महिला व पुरुष जखमी pic.twitter.com/6ROHokAaD4
— VIRALबाबा (@viralmedia70) March 4, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील लोणीकाळभोर कदमवाकवस्तीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडली आहे. याबाब कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @viralmedia70 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. एका युजरने महिलांचे एवढे रौद्र रुप पाहून मला घामच आला, तर दुसऱ्या एकाने त्या पठ्ठ्याला कोणी सांगितले होते त्यांच्यात पडायला. आणखी एका युजरने म्हटले आहे की, हे रोजचेच झाले आहे कोठे ना कोठे भांडण सुरु असतेच. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी देखील शेअर केले आहेत. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.