ट्रम्प-पुतिन, झेलेन्स्की अन्...; हे राष्ट्राध्यक्ष एकत्र मिळून गातायतं गाणे; AI चा थक्क करणार Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र, तर कधी थक्क करुन सोडणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे AI च्या मदतीने अनेक अनअपेक्षित असे व्हिडिओ बनवले जातात ज्याची आपण कधीच कल्पना केली नसेल. सध्या असाच एक थक्क करणारा AI व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील दृश्य पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की तसेच उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग आणि इतर काही राष्ट्राध्यक्ष एकत्र मिळून गाणे गाताना दिसत आहे. यामध्ये इराण आणि चीनचे अध्यक्ष देखील आहेत. मात्र, भारताचे पंतप्रधान यामध्ये नाहीत.
खरतरं अनेकदा या देशांमध्ये कोणत्या ना कोण्त्या कारणांवरुन खऱ्या आयुष्यात वादविवाद होत असतात. प्रत्येक राष्ट्राध्यक्षांची भूमिका आणि वर्तन खूप वेगळे आहे. अनेकदा यांचे एकमेकांविरोधात आक्रमक रुप पाहायला मिळाले आहे. सध्या तर झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात तीव्र वाद सुरु आहे. त्यांच्या या वादाचा परिणाम अनेकदा सामान्य लोकांना भोगावा लागतो. मात्र, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्य काही वेगळेच आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Listening to the ‘We Are the World’ sung by top world leaders— a healing song we need now more than ever. But my favorite leader is missing 🙁! (AI generated) pic.twitter.com/vXX0QACnKO
— Harsh Goenka (@hvgoenka) March 3, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @hvgoenka या अकाऊंटवर हर्ष गोएंका यांनी शेअर केला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जगातील सर्वोच्च नेत्यांनी गायलेले ‘वी आर द वर्ल्ड हे गाणे ऐकत आहोत – एक हिलिंग सॉंग , याची सद्या खूप आवश्यकता आहे. मात्र, माझा आवडता नेता यामध्ये नाही. हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ Ai जनरेटेड असून अनेकजण हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत. तर काहींनी याला मजेशीर म्हटले आहेत. तसेच अनेकांनी हे खऱ्या आयुष्यात कधीच पाहायला मिळणार नाही असे म्हटले आहे. तर काहींनी मोदींशिवाय हा व्हिडिओ खास नाही असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरस होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.