Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral

रस्त्यावर थरार! रस्ते नियमांचे उल्लंघन करत व्यक्तीने थेट ट्रॅफिक पोलिसाला गाडीच्या बोनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटतं नेलं. घटना ग्रेटर नोएडातील असल्याचे सांगण्यात आले असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 29, 2026 | 02:41 PM
रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral

रस्त्यावर कायदा चिरडला! कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर 500 मीटरपर्यंत फरफटत नेलं; ग्रेटर नोएडातील Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • वाहतूक नियमांचे उल्लंघन थांबवताना कार चालकाने ट्राफिक पोलिसाला बॉनेटवर बसवून तब्बल 500 मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला.
  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
  • घटनेची दखल घेत संबंधित चालकाविरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता असून तपास सुरू असल्याची माहिती आहे.
रस्त्यावर गाडी चालवताना रस्ते नियमांचे पालन होणे फार गरजेचे असते. अनेकदा लोक रस्ते नियमांचे उल्लंघन करतात आणि त्यांना असं करताना रोखण्यासाठीच रस्त्यावर ट्रॅफिक पोलिसांना तैनात केले जाते. परंतु, अलिकडेच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नियमित तपासणी दरम्यान, वाहतूक पोलिसाने एका कार चालकाला थांबण्यास सांगितले परंतु त्याने गाडीला न थांबवता चक्क पोलिसावरच गाडी नेऊन त्याला 500 मीटरपर्यंत ओढत नेले. घडलेली घटना फार धक्कादायक असून याचे फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेली ही घटना ग्रेटर नोएडातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, एक लाल रंगाची कार रस्त्यावरुन वेगाने जात असल्याचे दिसते. याचवेळी गाडीच्या बोनेटवर आपल्याला एक माणूस लटकल्याचेही स्पष्ट दिसून येते. हा माणूस दुसरा तिसरा कोण नसून ट्रॅफिक पोलिस असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसात तैनात असलेले कॉन्स्टेबल गुरमीत चौधरी हे पी-३ चौकात ड्युटीवर होते. त्यावेळी एक लाल रंगाची गाडी तिथे आली आणि कॉन्स्टेबलने ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा केला तेव्हा ड्रायव्हरने वेगाने आणि बेपरवाईने गाडी चालवली आणि पोलिसाला धडकण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत, आपला जीव वाचवण्यासाठी, कॉन्स्टेबल उडी मारून गाडीच्या बोनेटवर पडला. यानंतरही, कार चालकाने गाडी थांबवली नाही आणि सुमारे ५०० मीटर गाडी चालवत नेली. जेव्हा लोकांनी हे पाहिले आणि खूप आवाज केला तेव्हा त्याने गाडी थांबवली आणि तेव्हाच कॉन्स्टेबलचा जीव वाचला.पोलिस प्रवक्त्याने पुढे सांगितले की, कार नंबरच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा शोध सुरू आहे. यासाठी पथके देखील तयार करण्यात आली आहेत.

Greater Noida: A car was seen dragging a traffic police officer on its bonnet today near AWHO Township.
Hoping the officer is safe and the accused is arrested. 🙏🏻 @noidapolice pic.twitter.com/YsIfYhlfWs
— Greater Noida West (@GreaterNoidaW) January 28, 2026

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @GreaterNoidaW नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आशा आहे की पोलिस अधिकारी सुरक्षित असेल आणि त्या व्यक्तीला अटक झाली असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गंभीर बाब, दोषीवर कारवाई झालीच पाहिजे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काय लोक आहेत ना नियम पाळत, ना लोकांचा आदर करत… त्यांना प्राण्यांच्या श्रेणीत टाकायला हवं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral a car driver drags traffic police on bonnet for 500 meters in greater noida viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Noida
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा
1

अपघातानंतरची ती एक घटना अन् बाईक बनली देवता, प्रसादाला चढवली जाते दारू; जाणून घ्या राजस्थानच्या अनोख्या मंदिराची रंजक कथा

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral
2

25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral

दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral
3

दारूची नदी! पुर्तगालच्या रस्त्यावर वाहून गेली 22 लाख लीटरची रेड वाईन, लालभडक झाला रास्ता अन् घटनेचा Video Viral

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral 
4

काश्मीर हादरलं: सोनमर्गमध्ये अचानक फुटले बर्फाचे डोंगर, पाहताच सुन्न करणारे दृश्य अन् घटनेचा Video Viral 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.