(फोटो सौजन्य: Instagram)
25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral
मंदिराचा इतिहास
सोशल मिडियावर सध्या एक व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे ज्यात आपल्याला या अनोख्या मंदिराची माहिती देण्यात आली आहे. मंदिराला ओम बन्ना नावाने ओळखले जात असून हे नाव एका व्यक्तीचे होते ज्याच्या अपघातानंतर त्याच्या नावाने मंदिर स्थापित करण्यात आले. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे, २ डिसेंबर १९८८ रोजी, ओम सिंग राठोड (ओम बन्ना) नावाचा एक तरुण जोधपूरजवळ त्याची रॉयल एनफील्ड बुलेट (क्रमांक आरएनजे ७७७३) चालवत होता. तो एका झाडावर आदळला आणि त्याचा तात्काळ मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी तपासासाठी बाईक पोलिस ठाण्यात नेली. पण दुसऱ्या दिवशी त्यांना धक्का बसला कारण सकाळी, स्टेशनवरून बाईक गायब झाली होती. मुख्य म्हणजे नंतर त्यांना ती बाईक अपघाताच्या ठिकाणीच उभी असलेली आढळली. ही एक खोड आहे असे समजून त्यांनी ती परत आणली, इंधन टाकी रिकामी केली आणि जड कुलूपांनी साखळ्यांनी बाईकला बांधून ठेवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस पाहता तर काय… साखळ्या तुटल्या होत्या आणि बाईक अपघाताच्या ठिकाणी परत उभी होती. हे अनेक वेळा घडल्यानंतर, स्थानिकांना लक्षात आले की बाईकने त्याच्या मालकाला सोडण्यास नकार दिला आहे. त्यांनी मोटरसायकलभोवती एक मंदिर बांधले. आज, हजारो ट्रक चालक आणि प्रवासी तिथे थांबून बाईकला दारू देतात. असे मानले जाते की ओम बन्नाचा आत्मा रात्री महामार्गावर प्रवास करतो आणि चालकांना अपघातापासून वाचवण्याचे काम करतो. ही कहाणी भारतासाठी अद्वितीय आहे – मृत्यूच्या पलीकडे जाऊन एका यंत्राला देव बनवणाऱ्या निष्ठेची कथा.
दरम्यान याचा व्हिडिओ @storyninjaah नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही राजस्थानची खरी कहाणी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे! थोडा आदर दाखवा!” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मी या ठिकाणी गेलो होतो, आम्ही प्रवास करत असताना ड्रायव्हरने सांगितले की मला त्या मंदिरात जायचे आहे आणि आम्हीही येणार आहोत. काही दिवसांपूर्वी मी याबद्दलची एक घटना पाहिली होती, म्हणून जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मला ते आठवले आणि आम्ही आमच्या सुरक्षिततेसाठी त्याच्याकडे प्रार्थना केली. रात्रीची वेळ होती आणि आम्ही सुरक्षितपणे गंतव्यस्थानावर पोहोचलो. तो तिथे जणू संरक्षक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






