
10 व्या मजल्यावरून पडला अन् थेट हवेतच लटकला, जीव जाणार तितक्यात... थरारक अपघाताने सर्वांचाच श्वास रोखला; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सुरतमधील जहांगीराबाद येथील डी-मार्ट जवळील टाइम गॅलेक्सी इमारतीत घडून आली. सदर माणूस खिडकीजवळ झोपला असताना अचानक तो खाली घसरला आणि दोन मजल्याखाली असलेल्या खिडकीच्या ग्रिलमध्ये जाऊन अडकला. माहितीनुसार, व्यक्तीचे नाव नितीनभाई आदिया असून तो इमारतीच्या ब्लॉक ए मधील निवासी आहे. त्याचा पाय १० व्या मजल्यावरुन घसरला खरा पण यातून तो सुखरुप वाचला कारण सुदैवाने खाली पडताच तो आठव्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रिलमध्ये अडकला ज्यानंतर तेथून त्याला सुखरुप या परिस्थितून वाचवण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि व्यक्तीला वाचवण्यास सुरुवात केली. तासाभराहून अधिक काळाच्या अथक प्रयत्नांनंतर, पथकाने त्यांला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवले. वृत्तानुसार, त्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर आता शेअर करण्यात आला आहे. घटनेतील संपूर्ण थरार तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. @iamsuratcitynews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सुरत अग्निशमन दलाचे सर धवल मोहिते यांचे उत्तम टीम वर्क” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काही करायला घेताच गडबड होऊ जाते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो आता सुखरूप आहे का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.