
चालू ट्रेनला धडकला गरुड, काच फोडूनच आत शिरला अन् पक्ष्याच्या हल्ल्याने को-पायलटचं काढलं रक्त; अपघाताचा Video Viral
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे अनेक असे व्हिडिओ शेअर होतात जे आपण याआधी कधीही पाहिले नसतील. नुकताच सोशल मिडियावर एका ट्रेन अपघाताचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, मुख्य म्हणजे यात एका गरुडाने चालू ट्रेनच्या काचा फोडत ट्रेनमध्ये प्रवेश केला. यामुळे ड्रायव्हर जखमी झाला आणि या सर्व प्रकारामुळे ट्रेनला तात्काळ एका ठिकाणी थांबवावे लागले. माहितीनुसार, ही घटना श्रीनगर आणि अनंतनाग दरम्यान धावणाऱ्या ट्रेनमध्ये घडली. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
व्हायरल होत असलेल्या या घटनेत झालं असं की, ट्रेन चालू असताना अचानक एक गरुड उडत ट्रेनच्या काचेवर जाऊन आदळतो. डकेने गाडीच्या काचेचे तुकडे होतात आणि गरुड थेट ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसतो. यामुळे गरुड आणि ड्रायव्हर दोघांनाही दुखापत झाली. व्हिडिओमध्ये, गरुड एका कोपऱ्यात पडल्याचे दिसते तर ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर जखमा आणि रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून येते. या संपूर्ण घटनेमुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली आणि ड्रायव्हरवर प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने, गाडीतील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित होते.
चालकाच्या म्हणण्यानुसार, गरुडाने धडक दिल्यानंतर काच इतक्या जोरात फुटली की त्याचे तुकडे त्याच्या मानेला आणि तोंडाला भिडले आणि त्यामुळे रक्तस्त्राव झाला. तथापि, उपचारादरम्यान त्यांना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर ट्रेन अचानक थांबविण्यात आली, ज्यामुळे धक्का बसला आणि प्रवासी घाबरले.
🚆🦅 Eagle strikes moving train in J&K!
Windshield shattered, loco pilot injured
train halted for emergency aid.
Thankfully, all passengers are safe. 🙏#JammuAndKashmir #Srinagar #Anantnag #IndianRailways #TrainAccident #EagleCrash #BreakingNews #RailwayUpdate #KashmirNews pic.twitter.com/BA26KAZhTW — 🇮🇳Nishu priyank sharma (@NishuPriyank) November 9, 2025
सदर घटनेचा व्हिडिओ हा @NishuPriyank नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. अनेक यूजर्सने कमेंट करत घटनेवर आपले मत व्यक्त केले. काहींनी अधिक गंभीर अपघात झाला नाही याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर काहींनी अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून काचेला लोखंडी जाळीने झाकण्याचा सल्ला दिला.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.