(फोटो सौजन्य: Instagram)
हा कळप काही तास अभयारण्यात राहिला, परंतु नंतर ग्रुनर आणि इतर वन्यजीव तज्ञांनी त्यांना जंगलात परत पाठवले. “जर त्यांनी अभयारण्यात काहीतरी शिकार केली असती किंवा पाण्याचा स्रोत सापडला असता, तर ते तिथेच राहिले असते आणि सिर्गाचा प्रदेश ताब्यात घेतला असता,” असे ग्रुनर यांनी स्पष्ट केले. “मात्र सुदैवाने, असे झाले नाही आणि सिर्गा सुरक्षित आहे.” ग्रुनरच्या मते, “जर सिर्गाने त्यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला तर ते तिला मारुन टाकतील. सिंहाचे दोन गट हे कधीही एकत्र येत नाहीत. प्रत्येक गटाचे स्वतःचे क्षेत्र, अन्न आणि पाणी असते. सिर्गासाठी, हे अभयारण्य तिचे घर आहे आणि ती तिचे स्थान कोणालाही देऊ इच्छित नाही.
या व्हिडिओला @sirgatheliones नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिकचे व्युज मिळाले असून सिर्गाच्या सुरक्षिततेबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “कॅप्शन वाचून मी जवळजवळ रडलो. अरे देवा, मला खूप आनंद आहे की सिर्गा बाळ सुरक्षित आहे! आणि दुसरा गटही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते खूप सुंदर आहेत. मला आनंद आहे की संघर्षामुळे त्यांच्यापैकी कोणालाही नुकसान झाले नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सिर्गा सुरक्षित आहे याचा खूप आनंद आहे, किती सुंदर छोटे कुटुंब आहे. मी प्रार्थना करतो की ते सर्व सुरक्षित राहतील ”.
सिर्गा कोण आहे?
सिर्गाचा जन्म 2012 मध्ये बोत्सवानामध्ये झाला होता. ग्रुनरने तिला फक्त 10 दिवसांची असताना वाचवले होते. आता ती 2000 हेक्टरच्या अभयारण्यात मुक्तपणे राहते, जिथे ती स्वतः शिकार करते आणि नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






