
भयानक! विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळले, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर... अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विशालकाय मासा ज्याने व्यक्तीचा आधीच गिळंकृत केल्याचे दिसून येते. व्यक्तीचे जवळपास अर्धे माशाच्या आत असते आणि उरलेले शरीर हे त्याच्या तोंडाबाहेर असते. त्याचे मित्र माशाच्या तोंडातून व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करत असतात. एकाने व्यक्तीचे पाय पकडलेले असते तर दुसऱ्याने त्याचे तोंड आणि यातच तिसरा मित्र एका लाकडी काढीने माशाच्या शरीरावर वार करताना दिसतो. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते आणि व्यक्ती सुखरुप माशाच्या तोंडातून बाहेर पडतो. हा व्हिडीओ पाहायला अगदी खरोखरचा वाटत आहे. परंतू हा एक एआय जनरेटेड व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये घटना खरी असल्याचा दावा केला असला तरी यातील दृश्ये हा एआय कंटेट असल्याचा पुरावा देतात. अनेक यूजर्सनेही याला एआयद्वारे तयार केल्याचे मत व्यक्त केले आहे.
Shocking Catfish Attack in River, Friends Pull Man to Safety! pic.twitter.com/wP256xjzXX — YZY (@yeeezyyy360) November 22, 2025
सर्वांना क्षणभरासाठी घाबरवणारा हा व्हिडिओ @yeeezyyy360 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नदीत कॅटफिशचा धक्कादायक हल्ला, मित्रांनी माणसाला सुरक्षित ठिकाणी खेचले’. व्हिडिओला आतापर्यंत 9.3 मिलियन व्यूज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याची टोपी पडली नाही यावर माझा विश्वासच बसत नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जरी ते एआय असले तरी, मी अजूनही थोडेसे घाबरतो! या भीतीमुळे मी नद्या, तलाव किंवा समुद्रात पोहणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “टोपी तशीच राहिली, हा खरा व्हिडिओ नसू शकतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.