(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, वाघ नशेत गुंग झालेल्या मद्यपीला आपल्या तोंडात पकडून घरी सुखरुप आणून सोडताना दिसून येत आहे. तो मद्यपीला काळजीपूर्वक आपल्या तोंडात पकडतो आणि घर दिसताच घरासमोर त्याला जमिनीवर उतरवतो. माणून जमिनीवर लेटताच पुन्हा आपली दारुची बाटली उघडतो आणि त्यातून दारुचे सेवन करु लागतो. वाघ त्याला एकटक नजरेने पाहत असतो. मद्यपानाचे सेवन केल्याचे व्यक्तीला कशाचेही भान नसते. तो दारु पिल्यांनतर पुढच्याच क्षणी वाघावर हात उगारत त्याला तिकडून जाण्याचा आदेश देतो, ज्यावर वाघही तिकडून पळून जातो. व्हिडिओच्या आत व्यक्ती घराच्या आत प्रवेश करताना दिसून येतो. व्हिडिओतील हा सर्वच प्रकार आश्चर्यचकित करणारा असून याच्या सत्यतेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वाघासारखा धोकादायक प्राणी असे काही करणे शक्य नाही अशात हा एआयद्वारे बनवण्यात आल्याचा अंदाज आहे.
शराब में इतनी ताकत होती है, कि शराबियों को शेर घर छोड़ने आते हैं। 😂😁😂 pic.twitter.com/6nZiIrUGyX — Dinesh Kumar (@DineshRedBull) November 22, 2025
जंगलाच्या राजाने खाल्ला कुत्र्याचा मार, जबडा पकडून असा खेचला की वेदनेने सिंहही हादरला; Video Viral
दरम्यान हा व्हिडिओ @DineshRedBull नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘दारूमध्ये इतकी ताकद असते की सिंह दारू पिणाऱ्यांना घरी सोडायला येतात’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला तसही घरी जाऊन पत्नीचा मार खावा लागेल, यापेक्षा सिंहाने खाल्लं असतं तर बरं झालं असतं ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल, एआय अल्कोहोलपेक्षा अधिक शक्तिशाली बनला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कमाल आहे तसा आहे एआय व्हिडिओ वाटत आहे ”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






