
लग्न की गॅंग वॉर? वर-वधूंची स्पार्कल गनने एकमेकांवर फायरिंग; पाहून युजर्सही हादरले, 4 करोड लोकांनी पाहिला Viral Video
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नसमारंभ सुरू असल्याचे दिसते. स्टेजवर वधू-वर आणि काही मंडळी उपस्थित असतात आणि याचवेळी वधू आपल्या हातात असलेल्या स्पार्कल गनने वराच्या अंगावर आगीच्या ठिणग्यांचा पाऊस पाडते. यावर प्रतिक्रिया देत वर देखील आपल्या हातातील स्पार्कल गन चालू करतो आणि वधूवर निशाणा साधतो. हे घडत असताना बाकी मंडळी मात्र थक्क होऊन याचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करताना स्पष्ट दिसून येतात. व्हिडिओतील दृष्ये पाहता वर आणि वधू दोघांनाही काही दुखापत झाली नसल्याचे समजते पण स्पार्कल गन अशी अंगावर उडवणे धोकादायक आहे हे देखील तितकेच खरे. असे प्रकार प्रसिद्धीसाठी करताना आपल्या जीवाचाही तितकाच विचार करायला हवा.
दरम्यान लग्नसमारंभाचा व्हिडिओ @nehavermamberma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “लग्नालाही खेळ बनवून ठेवलं आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वेडिंग आहे की वेल्डिंगची स्पर्धा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दोघांनाही चांगला चोप द्यायला हवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.