(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
किंग कोब्रा हा जंगलातील एक धोकादायक प्राणी मानला जातो. त्याची दहशत फक्त जंगलातच नाही तर शहरी भागातही लोकांमध्ये तितकीत दिसून येतो. किंग कोब्राला पाहताच लोक आपली वाट बदलतात, अशात आपल्या बेडवर आपल्यसमोर तो बसला आहे ही भावना कुणालाही घाबरवून टाकणारी ठरते. ही घटना थायलंडच्या एका हाॅटेलमध्ये घडून आली. कपल हाॅटेलच्या बेडवर झोपले असताना अचानक त्यांच्या उशीखालून एका कोब्राने फुत्कार सोडला आणि त्यांना जाग आली. जेव्हा त्यांनी लाईट्स लावून आवाज कशाचा येत आहे याचा शोध घेतला तेव्हा त्यांना खोलीत कोब्रा येऊन बसल्याचे दिसले.
पलंगाच्या डोक्याकडच्या बाजूला एक किंग कोब्रा रेगांळत होता, जणू काही त्याने या जोडप्याच्या आधीच ही खोली बुक केली होती. धोकादायक गोष्ट ही आहे की, हे जोडपे सांगतात की जेव्हा ते गाढ झोपेत होते, तेव्हा हा विषारी साप त्यांच्या मानेवरून गेला होता, पण झोपेमुळे त्यांनी या धोक्याकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा तो खोलीत फुत्कारू लागला, तेव्हा ते जागे झाले आणि धोका ओळखून त्यांनी त्याला तपासले. माहितीनुसार, कोब्राने जोडप्यांचा चावा घेतला नाही पण त्याचा धोका खोलीत होता ही बाब देखील टाळता येत नाही.
या घटनेचा व्हिडिओ फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्यांच नशीब चांगल होत की कोब्राने त्यांना काहीही केलं नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोब्राने पण बहुधा ती हाॅटेल रुम बुक करुन ठेवली असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही खरोखर एक भितीदायक घटना आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






