
पाण्यात बुडत होत हत्तीचं पिल्लू, वाचवण्यासाठी आईसह संपूर्ण कुटुंबाने घेतली धाव; हृदयस्पर्शी Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपल्याला एक हत्ती पाण्यात बुडालेल्या पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण तितक्यातच तिथे दुसरा हत्ती येतो ज्याला पाहताच पहिला हत्ती थोडा मागे जातो आणि दुसरा हत्ती पिल्लाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागतो. यासहच काहीच क्षणात तिथे आणखी दोन हत्तींची देखील उपस्थित झाल्याचे दिसून येते. सर्वांच्या सहकार्याने अखेर हत्तीच्या कुटूंबाची बचाव मोहीम यशस्वी ठरते आणि पिल्लाला सुखरूप पाण्यातून बाहेर काढले जाते. कुटुंबाचे सहकार्य आणि प्रेम पिल्लाला बाहेर काढण्यास महत्त्वाची भूमिका बजावते. हत्तींमध्ये आपल्या बाळासाठी असलेला प्रेम आणि सुरक्षिततेचा भाव पाहून आता युजर्स चांगलेच खुश आहेत आणि हे दृश्य वेगाने शेअर करत आहेत. प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना असतात हे यातून स्पष्ट होते.
चेहऱ्यावर हास्य अन् आत्मविश्वास; Tejas पायलट नमांश स्याल यांचा मृत्यूपूर्वीचा VIDEO आला समोर
हा व्हायरल व्हिडिओ @wildfriends_africa नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला १.९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि २१,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बाळाला वाचवल्यानंतर त्यांनी त्याभोवती त्यांचे संरक्षणात्मक वर्तुळ कसे तयार केले ते खूप सुंदर आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई आणि कुटुंबाने बाळाला पाण्यातून बाहेर काढलं खूप छान काम केलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिचा थोडा वेळचा संघर्ष पाहणे खूप हृदयद्रावक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.