
कोर्टाच्या सुनावणीत कैदी निघाला न्यायाधीशांचा मित्र, भेटताच ढसाढसा रडला अन् पुढे जे घडलं... Video Viral
सोशल मिडियावर नुकताच एका कोर्ट रुमचा व्हिडिओ फार चर्चेत ठरत आहे. यातील दृश्यांनी आता सर्वांनाच भावूक केलं आहे. व्हिडिओमध्ये कोर्टाच्या सुनावणीदरम्यान अचानक अशी गोष्ट समोर येते ज्याचा कोणीही विचार केला नसेल. कोर्टाची सुनावणी चालू असतानाचं महिला न्यायाधीश आणि कैदी बालपणीचे मित्र असल्याचे स्पष्ट होते. संपूर्ण कोर्टाचे वातावरण क्षणातच बदलते आणि पुढे जे घडते ते सर्वांसाठीच धक्कादायक ठरते. चला व्हिडिओत काय घडून आलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओमध्ये, कोर्टामध्ये सुनावणी सुरु असल्याचे दिसते. या सुनावणीदरम्यानच महिला न्यायाधीश असं काही बोलते जे ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमिन हादरते. स्वत: कैदी ते ऐकून आपलं डोकं खाजवू लागतो. व्हिडिओमध्ये न्यायाधीशांना कैद्याकडे पाहताच त्याला कुठेतरी पाहिले असल्याचे जाणवते. ओळख पटताच ते दोघेही ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेचे नाव न्यायाधीश सांगतात जे ऐकताच कैदीला धक्का बसतो आणि पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओमध्ये, न्यायाधीशांनी कैद्याला पाहून टिप्पणी केली, “तो शाळेतला सर्वात हुशार मुलगा होता.” हे ऐकून कैदी आणखी भावनिक झाला. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की ते शाळेत चांगले मित्र होते, परंतु जीवनाच्या वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना वेगळे केले. आपल्या लहानपणाचा मित्र असा न्यायालयात तेही अशा परिस्थितीत भेटण हे कोणत्या चित्रपटाच्या सीनप्रमाणे वाटते पण हे दृश्य बनावटी नसून ते सत्यात घडून आले आहे आणि हिच गोष्ट लोकांना थक्क करत आहे.
Courtroom footage from 2015 shows Judge Mindy Glazer recognising the criminal as her former school classmate, Arthur Booth. pic.twitter.com/zktuaDCbwl — Morbid Knowledge (@Morbidful) March 29, 2024
या लक्षवेधी दृश्यांचा व्हिडिओ @Morbidful नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, ही घटना साल 2015 मध्ये घडून आली. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “छोटंसं जग, बरोबर? कल्पना करा की अशा अनपेक्षित परिस्थितीत तुम्हाला एका जुन्या वर्गमित्राशी गाठ पडावी लागेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आतापर्यंतचे सर्वात विचित्र शालेय पुनर्मिलन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दोन वेगवेगळ्या जीवनांची कहाणी. मला आशा आहे की तो त्याचे मार्ग बदलू शकला असेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.