
"तू त्याला बाबू बोललीच कशी...?", कानपूरच्या रस्त्यावर अंधाऱ्या रात्री मुलींमध्ये राडा; केस खेचत जमिनीवर लोळवलं अन्... Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर यात दोन मुलींमध्ये जोरदार मारामारी होत असल्याचे दिसते. पांढऱ्या टाॅपमधील मुलगी दुसऱ्या मुलीचे केस पकडून असते आणि ती तिला शिव्याशाप करत रागातच तिला मारत असते. व्हिडिओमध्ये मुलगी दुसऱ्या मुलीची केसं ओढते, तिला जमिनीवर लोटते आणि एकामागून एका तिला थप्पड मारु लागते. ती रागातच म्हणते की, “तू माझ्या बाॅयफ्रेंडला सोडून गेलीस, आता तो माझा आहे, मग तू अभिषेकला बाबू का बोलणार? मला सांग, तू त्याला बाबू का म्हणशील?” ती वारंवार विचारते की ती त्याला बाबू म्हणेल की नाही, आणि असाही आरोप करते की पीडितेने अभिषेकला सांगितले की ते आधी स्काय लॉनमध्ये भेटले होते.व्हिडिओमध्ये मागून आणखी काही मुली या राड्यात सामील असल्याचे समजते.
सूनसान सड़क,कैसी लड़कियां..
यूपी के कानपुर देर रात जिनके घर की ये औलाद,इन्हें शर्म न आएं,मां-बाप चुल्लू भर पानी में डूब मरेंगे?बीच सड़क वीडियो बना मारपीट-गाली गलौज? pic.twitter.com/TT7y5DomnC — Tushar Rai (@tusharcrai) December 29, 2025
व्हिडिओमध्ये पिडित मुलगी रडताना आणि मदतीची याचना करतना दिसते. मुलींच्या टोळीने आपल्यावर हल्ला केला आहे हे समजताच पिडित मुलगी गयावया करत पाय धरुन माफी मागताना दिसून येते. ही संपूर्ण घटना महामार्गावर रात्रीच्या सुमारास घडून आली. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच कानपूर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि या घटनेचा सखोल तपास सुरु केला. पोलिस दोन्ही पक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून लवकरच यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @tusharcrai नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.