(फोटो सौजन्य – Instagram)
रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
रात्रीच्या अंधारात, जेव्हा सगळे जग शांत झोपलेले असते, तेव्हा एका आईला रस्त्यावर टाकल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काळोख, थंडी आणि अनोळखी परिस्थितीमध्ये तिच्या असहाय्यतेचे दृश्य पाहून प्रत्येकाचे मन थरथरते. हा व्हिडिओ पाहताना फक्त भावनिक वेदना नाही तर असहाय्यतेची भीतीही जाणवते. व्हिडिओमध्ये, मुलगा आणि सुन चादरीसह झोपलेल्या आईल खेचत रस्त्याच्या कडेला टाकताना दिसून येतात. सुन सासुच्या अंगावर चादर टाकत तिचे तोंड झाकते आणि लगेचेच तिथून पळ काढते. व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, ही घटना अयोध्येतील किशुन दासपू येथे घडून आली आहे. या घटनेमुळे स्थानिक समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL
हा व्हिडिओ @bollywoodstori नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काळजी करू नका भविष्यात त्यांना याची किंमत मोजावी लागेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला हे पाहून फार वाईट वाटलं, ज्या आईने जन्माला घातलं, खायला दिलं, पालनपोषण केलं तिला तिच्याच मुलाने रस्त्यावर टाकलं हे फार दु:खद आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कर्म कधीही गोष्टी परत करायला विसरत नाही!”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






