Weight Loss Tips
पण त्यासाठी उपाशी राहण्याची किंवा डाएट करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी फळे, हिरव्या पालेभाज्या, फायबरयुक्त पदार्थ आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरु शकते. मग दिवाळीनंतर वजन कमी करण्यासाठी दररोजच्या रुटीनमध्यो कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या. (Post Diwali Weight Loss Tips)
फायबरयुक्त फळे खा
दिवाळीनंतर तुमच्या आहारात सफरचंद, पेरू, पपई, संत्री आणि नाशपाती यांसारख्या फळांचा समावेश करा. यामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते.
आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा
पालक, दुधी भोपळा, दोडका, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या भाज्या दररोज खा. या भाज्यांमधून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात. तुमच्या रोजच्या आहारात हंगामी भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.
दही आणि ताक यांचे सेवन करा
पचनासाठी दही आणि ताक हे चांगले पर्याय आहेत. त्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकतात. तुम्ही तुमच्या दुपारच्या जेवणात एक वाटी ताजे दही किंवा ताकाचा समावेश करु शकता.
भरपूर पाणी प्या
सणासुदीच्या काळात जास्त मीठ आणि साखर खाल्ल्याने तुम्हाला जड वाटू शकते. तसेच, यामुळे छातीत जळजळ, अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास जाणवू शकतो. म्हणून, दिवसभर भरपूर पाणी प्या. नारळाचे पाणी आणि साखर नसलेले लिंबाचे पाणी हे देखील चांगले पर्याय आहेत.
प्रथिनेयुक्त पदार्थ खा
शरीराला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. आपल्या आहारात डाळी, पनीर, अंडी, चणे, मूग आणि मोड आलेले धान्य यांचा समावेश करा. हे पदार्थ स्नायूंना पोषण देतात. तसेच, तुम्हाला यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते परिणामी अतिप्रमाणात खाणे टाळले जाते.
हलके, घरी बनवलेले जेवण घ्या
दिवाळीनंतर काही दिवस तळलेले पदार्थ, जंक फूड आणि अतिरिक्त साखर टाळा. याऐवजी खिचडी, डाळ-भात, व्हेज सूप आणि मल्टीग्रेन रोटी यांसारखे पर्याय निवडा.
नाश्त्यामध्ये ओट्स खा
नाश्त्यासाठी तुम्ही ओट्स, लापशी, पोहे किंवा व्हेज उपमा खाऊ शकता. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि संतुलित आहार राखण्यास मदत होते.
ग्रीन टी आणि हर्बल पेये प्या
चहा किंवा कॉफीच्या ऐवजी ग्रीन टी पिऊ शकता. परंतु, शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकण्यासाठी कोणत्याही पेयाला जादुई उपाय मानू नका.






