
एक दोन नाही तर तब्बल 5 कोब्रांना समोर घेऊन व्यक्तीने केलं असं काही की... पाहूनच उडेल थरकाप; Video Viral
कोब्रा हा जंगलातील एक धोकादायक प्राणी आहे, अशात त्याच्यासोबतची मस्ती आपल्याला महागात पडू शकते. कोब्रा आपल्या एका दंशानेच सोमरच्या व्यक्तीला मृत्यूच्या घेऱ्यात अडकवू शकतो. हेच कारण आहे की, कोब्राला पाहताच अनेकजण त्याच्यापासून आपला पळ काढू लागतात. परंतु, सोशल मिडियावर अलिकडेच एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात एक माणूस एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच कोब्रांसमोर कर्तब करताना दिसून आला. तो त्यांना पाहून घाबरत नाही ना पळून जातो. तो त्याच्यांसमोर भलतंच काहीतरी करुन दाखवतो, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पाचही कोब्रांसोबत आपला सामना होत आहे हे जाणवताच व्यक्ती घाबरत नाही तर त्यांच्यासमोर वेगळेच काही हातवारे करुन दाखवतो. कधी तो आपल्या हातांची कृती करतो तर कधी पाय मागे सारतो. हे सर्व सुरु असताना त्याची नजर मात्र त्या सर्व कोब्रांवरच असते. त्याची चपळता उल्लेखनीय असते, तो नक्की काय आणि का करत असतो हे तर बघून समजत नाही पण याची मदत त्याला निश्चितच होते. कोब्रा एकटक नजरेने माणूस काय करत आहे ते पाहत राहतो पण व्यक्तीवर एकही कोब्रा हल्ला करत नाही, जे पाहून सर्वच थक्क होतात. व्यक्तीचे धाडस आणि आत्मविश्वास पाहून आता सर्वजण चकीत झाले आहेत. व्हिडिओ रोमांचक असला तरी व्हिडिओतील ही कृती करणं आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतं. कोब्राचा हल्ला फार जबरदस्त असतो ज्यामुळे क्षणातही जीव जाण्याची शक्यता असते. अशात कोब्रासोबत कधीही मस्ती करु नये.
हा व्हायरल व्हिडिओ @munna_snake_rescuer नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नागीण डान्स करतोय वाटत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ नक्की काय करायला बघतोय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते नाग इतके शांत कसे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.