(फोटो सौजन्य: X)
चीनने पुन्हा एकदा ड्रोन उडवण्याचा स्वतःचाच जागतिक रेकाॅर्ड मोडला आहे. यावेळी चीनने एकाच वेळी तब्बल 1600 ड्रोन आकाशात लाँच करुन एक नवीन इतिहास रचला. यातील खास गोष्ट म्हणजे हे सर्व ड्रोन्स हे स्मार्ट एआय सिस्टमद्वारे नियंत्रित केले जात होते. याचे दृश्य फारच नेत्रदीपक होते. चीनच्या हुनान प्रांतातील लिउयांग शहरात हे दृश्ये दिसून आले. या शो दरम्यान, ड्रोनने आकाशात विविध आकार आणि सुंदर डिझाइन तयार केले. एका क्षणी त्यांनी फुलांचा आकार बनवला, तर दुसऱ्या क्षणी ते चिनी ध्वजात रूपांतरित झाले.
चीन ने एक स्मार्ट AI सिस्टम द्वारा नियंत्रित, 16,000 AI-संचालित ड्रोनों को एक साथ उड़ान भरकर खुदका ही विश्व रिकॉर्ड तोड़ दिया है। यह हुनान के लिउयांग में हुआ, जिसे “Home of Fireworks” के रूप में जाना जाता है। pic.twitter.com/ZLPhLN5m6c — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) November 6, 2025
ड्रोन कोडद्वारे एआय सिस्टमशी जोडलेले असतात.
वृत्तानुसार, हा संपूर्ण कार्यक्रम चीनच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचा एक भाग होता, ज्यामध्ये देशाच्या तंत्रज्ञानाचे आणि क्षमतांचे प्रदर्शन करण्यात आले. ड्रोन शो चालवणाऱ्या अभियंत्यांनी सांगितले की प्रत्येक ड्रोन वेगळ्या कोडचा वापर करून एआय सिस्टमशी जोडलेला होता, ज्यामुळे सर्व ड्रोन एकाच वेळी योग्य दिशेने उड्डाण करत होते. लोक हे दृश्य पाहून थक्क झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आणि त्याला जगातील सर्वात सुंदर एआय शो म्हटले. चीनकडे पूर्वी ५,००० ड्रोनसह हा विक्रम होता, परंतु आता तो अनेक पटींनी वाढला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






