
लगता है बहुत याराना है! मित्राच्या लग्नासाठी चक्क जेलची बंधनं तोडून आला बाहेर... हातात बेड्या घालून केला भांगडा; Video Viral
सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडिओज शेअर केले जातात आणि यातील काही व्हिडिओ हे लक्षवेधी ठरतात. या व्हिडिओमध्ये अनेकदा अशा काही थक्क करणाऱ्या गोष्टी दाखवल्या जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इथे अनेक अशी दृश्ये शेअर केली जातात जी पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. अलीकडेच इंटरनेटवर एक रंजक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच अचंबित केलं. व्हिडिओमध्ये काही सरदारजी पार्टीमध्ये भांगडा करताना दिसून येतात पण यात लक्षवेधी ठरतात ते हातकडी घालून डान्स करणारे सरदार जी. होय, तुम्ही बरोबर ऐकलं या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती असाही दिसेल ज्याच्या हातात बेड्या घातल्या आहेत पण कशाची ही पर्वा न करता तो मनसोक्तपणे भांगडा करताना दिसून येतो. चला यात पुढे काय घडलं ते जाणून घेऊया.
एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका लग्नातील आहे. व्हिडिओमध्ये लोकांचा जमाव डीजेवर नाचताना दिसत आहे आणि त्यामध्ये एक पुरूष मोठ्या उत्साहाने नाचताना दिसत आहे. तथापि, व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण वेगळे आहे. तो पुरूष थेट तुरुंगातून लग्नात आला होता. तो खास परवानगीने आला असावा, कारण त्याला हातकडी लावलेली आहे आणि एका पोलिसाने हातकडीचे दुसरे टोक धरलेले दिसते. जवळच आणखी एक पोलिस उभा असल्याचे दिसून येते. हातकडी घालून डान्स करणाऱ्या सरदारजीच्या या व्हिडिओने आता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हातात हातकडी असूनही व्यक्तीच्या उत्साहाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.
Girls: Sorry, I will not be able to attend your wedding, my leaves were not approved. Boys: pic.twitter.com/iCA8WYeyXa — Hemaang (@JrSehgal) November 17, 2025
एक चुकी अन् महिलेचा जीव लागला टांगणीला! मशीनला चिपकली, गोल गोल फिरली अन्… चित्तथरारक Video Viral
हा मजेदार व्हिडिओ @JrSehgal नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “असं काम करायचंच कशाला की जर आनंदाच्या क्षणी तुम्हाला हातकडी घालून आनंद साजरा करावा लागत असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कोणतीही गोष्ट तुम्हाला नाचण्यापासून रोखू शकत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तरीही तुमचा भांगडा मला चांगला वाटलं सरदार जी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.