
चिमुकलीच्या निरागसतेवर चोरही पिघळला, चोरीचं सर्व सामान वडिलांना केलं परत... लोक म्हणाले, "क्या चोर बेनेगा तू"; Video Viral
इंटरनेटवर दररोज शेकडो व्हिडिओ शेअर केले जातात आणि त्यातील काही व्हिडिओज लक्षवेधी ठरतात. आताही इथे असाच एक नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात चोरीची घटना कैद झाली. चोर आला तर चोरी करायला होता पण जाता जाता तो लोकांची मने जिंकून गेला. व्हिडिओमध्ये दिसते की, चोर एका दुकानात शिरून दुकानदाराला घाबरवत त्याच्याकडून गल्ल्यातील पैसे मागत आहे. दुकानारही घाबरून त्याला सर्व पैसे देऊ करतो पण तितक्यात बाजूला बसलेली चिमुकली असं काही करते की चोर चोरी न करताच तिथून निघून जातो. आता व्हिडिओत नक्की काय घडलं आणि चिमुकलीने चोराचं मतपरिवर्तन कसं केलं ते चला जाणून घेऊया.
बछड्यावर हात उचलताच सिंहीणी रागातच उठली, थेट जंगलाच्या राजालाच मारली थप्पड; मजेदार Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, दुकानात एक चोर हिंसकरित्या एंट्री घेतो. तो आत शिरताच गल्ल्यावर बसलेल्या दुकानदारावर हल्ला करतो, त्याला घाबरवतो आणि सर्व पैसे देण्याचा हुकूम देतो. यावेळी बाजूला बसलेली चिमुकली हा सर्व प्रकार पाहत असते. दुकानदार सर्व पैसे चोराच्या हातात दिल्यानंतर चोर जाण्याच्या तयारीत असतो पण याचवेळी चिमुकली त्याला आपलं चॉकलेट देऊ पाहते. तिच्या मनातील निष्पाप भाव आणि चेहऱ्यावरची निरागसता एकंदरीतच चोराच्या मनाला भिडते आणि तो सर्व पैसे दुकानदाराला परत करून तिथून निघून जातो. चोराची ही माणुसकी पाहून युजर्स आता त्याच्यावर चांगलेच खुश झाले आहेत आणि त्याच्या कृतीची इंटरनेटवर प्रशंसा केली जात आहे. प्रेमळ भावना वाईट गोष्टींवर कशी मात करू शकते ते आपल्याला या व्हिडिओत पाहता येते.
मित्राच्या लग्नासमोर कोण पोलिस आणि काय तुरुंग! हातात बेड्या घालून पठ्ठ्या भांगड्यात दंग; Video Video
हा व्हायरल व्हिडिओ @jinny_memes नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे काय चोर होशील रे तू? तू तर इमोशनल झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “छोटी मुलगी म्हणत असेल घे माझीही मौलयवान वस्तू घेऊन जा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्याच्यात माणुसकी जिवंत होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.