
जेव्हा संस्कार ओव्हरलोड होतात! मॉलमधील पुतळ्यांना पाहताच चिमुकलीने असं काही केलं... पाहून सर्वांनाच आलं हसू; Video Viral
लहान मुलं ही फार नाजूक आणि मातीच्या ढाच्यासारखी असतात आपण जसा आकार देऊ तशी ती बनत जातात, स्वत:ला घडवत जातात. लहानमुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या असतील, त्यांना चांगला माणूस बनवायचे असेल तर याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच केली जाते. भारतीय परंपरेनुसार फार पूर्वीपासून छोट्या मुलांना त्यांच्या बालपणीच उत्तम संस्कार दिले जातात. यात पालक अपयशी ठरले तर मुलांना याचा टोमणा पुढे जाऊन नक्कीच ऐकावा लागतो. तुझ्या आई वडिलांनी तुला हेच संस्कार दिले का अशी आलोचना लोक करु लागतात. पण याच मुलाचे वर्तन जर चांगले दिसले तर त्याला त्याच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिले आहेत असं म्हणत त्याची प्रशंसा केली जाते. थोडक्यात काय तर समाजात राहायचे तर आपल्या अंगी चांगले गुण असणे आणि ते गुण आपल्या कृतीतून दिसून येणे फार महत्त्वाचे आहे.
व्हिडिओत काय दिसलं?
नुकताच सोशल मिडियावर एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात चिमुकलीला संस्कारांचा जरा जास्तच डोस दिल्याचे दिसले. आता आम्ही असं का म्हणत आहोत याची प्रचिती तुम्हाला व्हिडिओतील दृश्ये पाहिल्यानंतर येईल. आपल्याकडे लहान मुलांनी आदराने मोठ्या व्यक्तीच्या पाया पडण्याची परंपरा आहे अशात इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुकली माॅलमधील पुतळ्यांचे आशिर्वाद घेताना दिसून आली. ते निर्जीव आहेत हे लक्षात न घेता आपल्यापेक्षा ते मोठे दिसत आहेत हे पाहून ती एक एक पुतळ्याजवळ जाऊन त्याचे पाय पकडू लागली. यूजर्स हे दृश्य पाहून भारीच खुश झाले असून अनेकांनी या व्हिडिओची मजा लुटली आहे.
जब संस्कार ओवरलोड हो जाए 🤭😂 pic.twitter.com/WJuIO3mv20 — 𝐑𝐚𝐦𝐚𝐧𝐚𝐧𝐝 (@Ramanand06) November 7, 2025
चिमुकलीचा हा व्हिडिओ हा व्हायरल व्हिडिओ @Ramanand06 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, ही तर खूप जास्त संस्कारी आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजकाल अशी मुले कुठे दिसत आहेत? अशी सुसंस्कृत मुले खूप कमी आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “किती गोंडस मुलगी आहे, ती खरोखर खूप संस्कारी आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.