
ब्राझीलमध्ये वादळाने माजवला कहर, अवघ्या काही सेकंदातच 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टि'ची प्रतिमा कोसळली; घटनेचा थरारक Video Viral
अहवालांनुसार, पुतळ्याचा ११ मीटर उंच पाया मजबूत राहिला. स्टोअर कर्मचाऱ्यांनी ताबडतोब परिसर रिकामा केला, त्यामुळे कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. गुआईबाचे महापौर मार्सेलो मरनाटा यांनी पुष्टी केली की वाऱ्याचा वेग ८०-९० किमी/ताशी पोहोचला. हेवन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात आले आणि काही तासांतच मलबा हटवण्याचे काम सुरू झाले. कंपनीने असेही म्हटले आहे की त्यांच्या स्टोअरमधील सर्व प्रतिकृती तांत्रिक मानकांनुसार सुरक्षित आहेत आणि आता पुढील तपास सुरू झाला आहे.
सरकारने अलर्ट जारी केला
या घटनेनंतर आता ब्राझीलची नागरी संरक्षण संस्था डेफेसा सिव्हिलने तीव्र हवामानाचा अलर्ट जारी केला आहे. दुपारी रिओ ग्रांडे दो सुलमध्ये कमी दाबाची प्रणाली आली, ज्यामुळे उष्ण आणि थंड हवामान एकमेकांशी टक्कर देत दाट ढग आणि जोरदार गडगडाटी वादळे निर्माण झाली. हवामान संस्थांनी वाऱ्याचा वेग वाढण्याचा इशारा दिला आणि हाय अलर्ट असणाऱ्या भागांमध्ये सुरक्षितता उपायांचे आवाहन केले. सेल सिस्टमच्या सूचनांमुळे अनेक लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडिओ
सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओत जर आपण पाहिलं तर यात दिसतं की, परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. या वाऱ्यापासून आपला बचाव करण्यासाठी अनेक वाहनचालक बांधकाम कोसळू लागल्याने त्यांची वाहने दूर हलवण्याचा प्रयत्न करतानाही यात दिसून येत आहे. या घटनेनंतर आता तांत्रिक पथकाने यामागील कारणाचा तपास सुरू केला आहे. दुकान उघडे ठेवले आहे परंतु बाहेरील लोकांना प्रवेश प्रतिबंधित आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हेवन आता त्याच्या सर्व स्टोअर प्रतिकृतींच्या वादळ-प्रतिरोधक क्षमतेचे मूल्यांकन करत आहे.