
अंगावर जिवंत सापांना गुंडाळून मॉडेलने रेड कार्पेटवर मारली धमाकेदार एंट्री, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
आजच्या या सोशल मिडियाच्या दुनियेत कोणती गोष्ट आपल्या नजरेसमोर येईल याचा नेम नाही. इंटरनेट एक अशी गोष्ट आहे जिथे रोजच अनेक अजब-गजब आणि थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. पण आपण पाहत असलेली सर्वच दृश्ये खरी आहेत असं नाही. असं म्हणतात की जे दिसतं तेच खरं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, डिजिटिल युगात यूजर्ससोबत काही असेच घडून येत आहे. अलिकडेच सोशल मिडियावर एका माॅडेलचा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडलं.यामध्ये माॅडेलने जिवंत सापांसह रेड कार्पेटवर पोज देताना दिसली. या सर्वच दृश्यांनी लोकांना आश्चर्यचकित केलं खरं पण यामागचं सत्य काही वेगळंच होतं. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये माॅडेलने एक गाऊन परीधान केला असून तिच्या संपूर्ण शरीरावर तिने जिवंत साप गुंडाळल्याचे स्पष्ट दिसून येते. ती रेड कार्पेटवर पोज देते आणि अनेक फ्लॅशलाईट्स तिच्या चेहऱ्यावर पडतात. अनेक फोटोग्राफर्स हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करत असल्याचे व्हिडिओत दाखवले जाते पण हे जे काही दिसते ते खरोखरचे दृश्य नाही. वास्तविक, हा संपूर्ण व्हिडिओ एआय निर्मित असतो. व्हिडीओ अर्थातच AI ने तयार केलेला आहे. यात दाखवण्यात आलेली ही दृश्ये इतकी खरीखुरी वाटतात की सर्वांनाच ती पाहून हे सत्यात घडून येत असल्याचा भास होऊ लागतो. या तरुणीच्या अंगावर हिरव्या रंगाचे विषारी साप आणि मोठमोठे अजगर फिरताना दिसतात जे पाहून सर्वांच्याच अंगावर शहारा येतो. AI आपल्याला कसे संभ्रमात पाडू शकते याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडिओतून दिसून येते.’
हा व्हायरल व्हिडिओ @sherrysoni.wav नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप छान” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे एआय आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “उर्फी जावेद असं करुन दाखवू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.