
सिधी बात नो बकवास! मॅनेजरने उशीरा आल्याचा पुरावा मागताच कर्मचाऱ्याने टेबलावर फेकून मारला पंक्चर टायर; मजेदार Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका मिटिंगमधील दृष्य दाखवण्यात आले. मॅनेजरने उशीर आल्याचा कर्मचाऱ्यांकडे पुरावा मागितला ज्याच्या उत्तरात कर्मचाऱ्याने रागात असं काही केलं की पाहून सर्वच थबकले. व्हिडिओमध्ये, कर्मचारी रागात येऊन मॅनेजरसमोर ठेवलेल्या टेबलावर टायर ठेवताना दिसून येतो. त्याचे हे कृत्य सर्वांनाच धक्का देणारे होते. कर्मचाऱ्याची ही कृती केवळ अनपेक्षित नव्हती तर बैठकीचे संपूर्ण वातावरणच बदलून टाकणारी ठरली. व्हिडिओमध्ये इतर कर्मचारी एकमेकांकडे पाहत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
टायर मारल्यानंतर, कर्मचारी व्यवस्थापकाला काहीतरी बोलताना दिसतो. व्हिडिओमध्ये त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नसला तरी, त्याच्या देहबोलीवरून असे दिसून येते की तो खूप रागावला आहे, कदाचित तो असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की पंक्चर झालेला टायर त्याच्या उशीराचे खरे कारण होते. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊ नये म्हणून त्याने हे पाऊल उचलले असे दिसते. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करताना दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ @corporate_chuglighar5 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “नेमकं काय घडलं?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप योग्य कारण, पुराव्यांसह”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.