
माणुसकीला कलंक! समोर मृतदेह पडलाय अन् महिला रीलमध्ये करते रडण्याचं नाटक, पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral
सोशल मिडियावर स्वत:ला व्हायरल करण्यासाठी लोक अनेक नको ते प्रकार करु पाहतात. कोणी स्टंट करु पाहत कर कोणी नको ते जुगाड करतात. इथे अनेक असे व्हिडिओही शेअर होतात ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. आताच्या जगात माणूसकी लोकांमध्ये राहिली नाही असं म्हणतात. याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दु:खाच्या काळातही महिला व्हिडिओसाठी ड्रामा करताना दिसते. समोर मेलेल्या माणसाचं शव असतानाही महिला रिलसाठी रडण्याचं नाटक करु पाहते. हे सर्वच दृश्य लोकांना धक्का देणारं असतं ज्यामुळे कमी वेळातच हा व्हिडिओ व्हायरल होतो. व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एका वृद्ध माणसाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. व्यक्तीचं शव जमिनीवर ठेवलेलं असताना संपूर्ण घरात शोककळा पसरली असते. नातेवाईक आणि शेजारी कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी एकत्र जमले आहेत. पण या दुःखाच्या क्षणीही, एका महिलेने एक रील बनवण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओमध्ये, तुम्हाला ती महिला मृतदेहासमोर बसून रडताना दिसेल, ती रील पूर्णपणे दाखवत आहे. तिच्या धक्कादायक कृतींमुळे सोशल मीडियावरील सर्वांनाच गोंधळात टाकले आहे. महिलेच्या या कृतीने यूजर्सचा संताप अनावर केला असून लोक आता व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सदर घटनेवर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ही रील सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा एक चिंताजनक आणि हृदयद्रावक पैलू अधोरेखित करते.
हा व्हायरल व्हिडिओ @realistictrolls नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मार्केटमध्ये नवीन कंटेट आला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “चुकीने त्याने डोळे उघडले तर तो पळून जायचा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “काकूंकडून मोबाईल घ्या, या लोकांनी इंस्टाग्रामही उद्ध्वस्त केला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.