(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे असे अनेक दृश्य शेअर केले जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. आताही काही असंच काहीसं दिसून आलं आहे. अपंगत्व ही एक अशी अवस्था आहे ज्यात आपले शरीर आपली कोणतीही मदत करु शकत नाही. कुणाला हात नसतात तर कुणाला पाय… आपले हात किंवा पाय नसताना आयुष्य किती अवघड होत असेल याचा विचार करा. पायांशिवाय आपण चालू शकत नाही आणि हातांशिवाय आपण कोणतेही काम करु शकत नाही.
पण नुकताच एका अपंग व्यक्तीचा अनोखा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्यक्तीला हात नाहीत पण तरीही तो व्हिडिओमध्ये बाईक चालवताना दिसून येत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की, व्यक्तीला जर हातच नाही तर तो बाईक कसा चालवू शकतो तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अपंग व्यक्ती हाताने नाही तर त्याच्या पायाने बाईक चालवताना दिसून आला आहे. त्याची ही जिद्द पाहून सर्वच हादरले आणि लोकांना या व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात रस्त्याने अनेक गाड्या धावताना दिसून येतात पण या सर्वांमध्ये आकर्षक ठरते ती अपंग व्यक्तीची बाईक. यात व्यक्तील हात नसल्याचे स्पष्ट दिसून येते आणि अशा परिस्थितीत तो हार न मानता आपल्या पायांनी बाईक चालवण्याचा प्रयत्न करतो. त्याची हा जिद्द सर्वांनाच थक्क करण्यासारखी, मागून जाणाऱ्या एका गाडीवरील व्यक्तीने माणसाचा हा पराक्रम पाहिला आणि त्याने हे दृश्य आपल्या कॅमेरात टिपले. व्हिडिओमध्ये व्यक्ती अजिबात न डगमगता आत्मविश्वासाने बाईकची सवारी करताना दिसतो. युजर्सने आता व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, काहींनी व्यक्तीच्या काैशल्याचे काैतुक केला आहे तर काहींनी सुरक्षेचा धोका असल्याचे म्हटले आहे.
घटनेचा हा व्हिडिओ @vinod_kumar11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी या व्यक्तीला मुंबईहून अजमेरला त्याच्या बाईकवरून त्याच मार्गाने प्रवास करताना पाहिले आहे. त्याचे नाव फारुख बावा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काकांकडे माझ्यापेक्षा चांगले ड्रायव्हिंग स्किल्स आहेत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भारतीय रस्त्यांवर ते धोकादायक ठरू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






