(फोटो सौजन्य: X)
जंगलात शिकारीचे दृश्य दिसणे फार सामान्य गोष्ट आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलातील मोठे प्राणी हे लहान कमजोर प्राण्यांची शिकार करतात आणि याचप्रमाणे अन्नसाखळी आपले कार्य करते. शिकाऱ्याने कोणत्या भक्ष्यावर नजर टाकली की मग त्याची यातून सुटका होणे जवळ जवळ असंभव आहे पण एका अस्वलाने हे करुन दाखवले आहे. इंटरनेटवर जंगलातील एक मजेदार दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्यात एका वाघाने अस्वलाला पाहताच त्याच्यावर हल्ला चढवल्याचे दिसून आले. वाघासारख्या धोकादायक आणि बलवान प्राण्यासमोर अस्वलाचा काय निकाल लागणार पण तरीही अस्वल यातून आपली सुटका करतो आणि वाघाला पागल बनवण्यात यशस्वी ठरतो. आता अस्वलाने हे सर्व कसं केलं ते चला व्हिडिओतून जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, जंगलात एका अस्वलासमोर एक वाघ आल्याचे दिसते. वाघाची नजर अस्वलाची शिकार करु पाहत असते पण अस्वल यावेळी घाबरुन न जाता आपल्या युक्तीचा पुरेपूर वापर करुन घेतो. वाघाने हल्ला करताच अस्वलही त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतो ज्यानंतर वाघ अस्वलासमोर गुपचूप मांडी घालून बसतो. त्याला अपेक्षा असते की, अस्वलही त्याला फाॅलो करत खाली बसेल आणि संधी साधून तो त्याच्यावर हल्ला करेल पण व्हिडिओत असं काहीच घडत नाही. वाघाला खाली बसलेलं पाहताच अस्वल त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतो आणि हळुहळु मागे जात संधीचा फायदा घेत एका क्षणातच तिथून छूमंतर होतो. सिंह हे सर्व दृश्य आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो. भक्ष्य आपल्यापासून फार दूर गेला आहे हे त्याला समजते ज्यामुळे मान खाली करत दुसऱ्या वाटेने तो गुपचूप निघून जातो.
A sloth bear wards off a tiger attack pic.twitter.com/161uo4n2u3 — Damn Nature You Scary (@AmazingSights) November 3, 2025
चोरी करायला गेलेल्या महिलेला दुकानदाराने धु धु धुतलं, कानशिलात लागावले तब्बल 17 थप्पड; Video Viral
यूजर्स आता अस्वलाचे कौतुक करत आहेत आणि त्याला जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी असल्याची उपमाही दिली जात आहे. हा व्हायरल व्हिडिओ @AmazingSights नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “वाघाचे वजन ३०० किलोपेक्षा जास्त आहे, कोणीही वाघाशी खेळू नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाघाला भूक नव्हती नाहीतर त्याने अस्वलाची शिकार केली असती ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अस्वल इतके हुशार असतात हे मला माहितीच नव्हतं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






