
गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने सर्वांचेच हृदय जिंकून घेतले आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात RTO चे अधिकारी रायडरची बाईक उचलून घेऊन जाताना दिसतात. त्याने नो पार्किंगमध्ये आपली गाडी लावल्याने त्याची गाडी अधिकार्यांद्वारे उचलली जात होती. रायडरचा जशी याची माहिती मिळते तो धावत पळत जाऊन सर्वात पहिले बाईकमधील ग्राहकाचे सामान बाहेर काढतो. पुढे रायडर सामान हातात घेऊन चालतच त्याची डिलिव्हरी करायला जाताना दिसतो. रायडरच्या या कृतीने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. काहींनी तर कंपनीने त्याला स्पेशल अवाॅर्ड द्यायला हवा अशीही मागणी केली तर काहींनी त्याच्या हतबलतेवर दुःख व्यक्त करत म्हटले की फाईनवर बरेच पैसे खर्च करावे लागणार म्हणून आता तो डिलिव्हरीतून त्याला मिळणाऱ्या २० रुपयांचा विचार करत आहे जे फार दुःखद आहे.
एका व्यक्तीने आपल्या चारचाकीत बसून मागून हा व्हिडिओ शूट केल्याचे स्पष्ट होत आहे. व्हिडिओला @vibes_of_people नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “त्याला त्याची स्कुटर देऊन टाका यार, मला माहित आहे तो खूप कष्ट करतोय आणि मेहनत करतोय, श्रीमंत लोकांना शिक्षा का होत नाही आणि गरिबांवरच अत्याचार का होत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “किमान त्याची ऑर्डर डिलिव्हर करायला कुणीतरी त्याची मदत करायला हवी होती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “किती दुःखाची गोष्ट आहे, त्याची दिवसभराची कमाई काही सेकंदात संपून जाईल..”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.