(फोटो सौजन्य – X)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका रुग्णाला बेडवर पडलेले दाखवले आहे आणि त्यांच्यासमोर एक डॉक्टर उभा आहे. सर्वकाही सामान्य दिसत असतानाच अचानक परिस्थिती बदलते आणि डॉक्टर रुग्नाला मारायला सुरवात करतो. रुग्णही कुठे ऐकतोय दुसऱ्या हाती तोही डॉक्टरांवर वार करायला सज्ज होतो. व्हिडिओमध्ये रुग्ण डॉक्टरांना लाथांनी हाणताना दिसतो तर डॉक्टरही रुग्णाला बुक्क्यांनी मारतात. व्हिडिओमध्ये अन्य लोक हे भांडण थांवण्याचा प्रयत्न करताना दिसतात पण डॉक्टर रुग्णातील हा वाद इतका वाढलेला असतो की दोघेही भांडण थांबवायला तयार होत नाही. व्हिडिओच्या शेवटपर्यंत डॉक्टर आणि रुग्ण हाणामारी करताना दिसतात.
रुग्णाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ते एंडोस्कोपीसाठी आले होते. बेडवर कोण झोपावे यावरून वाद झाला. कथितरित्या, डॉक्टरने रुग्णाशी असभ्य वर्तन केले. जेव्हा रुग्णाने विचारले की तो घरी असे बोलतो का, तेव्हा डॉक्टरांनी त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान कुटुंबीयांनी आता डॉक्टरविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका युजरने लिहिले आहे, “काय चाललंय? रुग्ण आणि डॉक्टर यांच्या वर्तनाकडे पाहून असं वाटतंय, मग रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात हा विश्वास कसा निर्माण होईल?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजच्या रुग्णालयाची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटते.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खूप जास्त लज्जास्पद कृत्य आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






