viral ai video monkey working in office video goes viral
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ पाहायला मिळतात. तर कधी आश्चर्याचा धक्का देणार, थरकाप उडवणारे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. कधी डान्स, तर कधी स्टंट तर कधी जुगाडाचे भन्नाट असे व्हिडिओ पाहायला मिळतात. याशिवाय, प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असता. सध्या असाच एक भन्नाट असा आश्चर्यचकित करणारा माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये एक माकड कमप्युटरवर काम करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक माकड कमप्युटरवर काम करत आहे. माकड वाऱ्याच्या वेगाने टाइपिंग करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या माकडाने चष्मा लावला आहे, तसेच गळ्यात आयडीकार्ड देखील घातले आहे. यामुळे तो अगदी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासारखा दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. माकड अगदी गांभीर्याने कप्युटरवर काम करत आहे. असे वाटत आहे की कोणता तरी महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरु आहे. मात्र हा व्हिडिओ पाहून वाटते की, हा व्हिडिओ AI च्या मदतीने बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भन्नाट अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
अलीकडे AI च्या मदतीने कल्पने बाहेरच्या गोष्टी देखील तयार केल्या जातात. अनेकदा आपण विचारही केला नसेल अशा गोष्टी AI च्या मदतीने, रेखाटल्या जातात, यामध्ये फोटो, व्हिडिओ अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. अनेकदा या गोष्टी पाहून त्या खऱ्या असल्याचा भास होतो. हा व्हिडिओ देखील असाच आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @funny_videos_1240 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओ अनेकांनी मजेशीर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कामगार कमी पडले की काय असा प्रश्न विचारला आहे, तर दुसऱ्या एका युजरने कंपनीतील सर्वात मेहनती कर्मचारी असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घालत आहे. पण कृत्रिम बुद्धीमतेच्या सहाय्याने असे अनेक व्हिडिओ आपल्याला तयार करता येतील.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.