(फोटो सौजन्य: Instagram )
प्रेमीयुगुलाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा कपल्स आपले भान हरपून नको ते प्रकार करू पाहतात. असं म्हणतात की, प्रेम केलं तर त्यात घाबरायचं काय पण आजकाल याचा अर्थ लोक फार वेगळ्या अर्थाने घेतात आणि वाटेल त्या ठिकाणी आपल्या प्रेमाचे प्रदर्शन घडवू लागतात. आपण काय करत आहोत, कुठे करत आहोत याचा किंवा आजुबाजूच्या परिस्थितीचा ते अजिबात भान ठेवत नाही. आताही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कपल्सचे असेच एक लज्जास्पद कृत्य दिसून आले. नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते, इथे कधी महिलांची तुंबळ हाणामारी होते तर कधी काही विचित्र प्रकार शेअर होतात. जगाच्या कोपऱ्यात काही घडो वा ना घडो पण दिल्ली मेट्रो मात्र नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात कपल्स सर्व प्रवाशांसमोर रोमान्स करताना दिसून आले. ही सर्व दृश्ये तेथील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यापुढे बुमराह मलिंगाही होतील फेल, तरुणाची बॉलिंग स्टाईल पाहून तुम्हीही व्हाल दिवाणे; Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक कपल मेट्रोमध्ये एकमेकांना घट्ट मिठी मारून दरवाजाच्या बाजूला उभे असल्याचे दिसते. त्यांचा हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूचे प्रवासी अस्वस्थ झाल्याचे स्पष्ट समजते, मात्र तरीही हा तरुण त्या मुलीला आपल्या मिठीतुन सोडायला तयार होत नाही. ही घटना आता सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी हे वर्तन सार्वजनिक ठिकाणी अयोग्य ठरवले, तर काहींनी खाजगी क्षण इतक्या उघडपणे शेअर करण्यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान गेल्या काही काळापासून कपल्सचे असे अश्लील चाळे अनेकदा इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत ज्यात सार्वजनिक ठिकाणी आपले भान हरपून बसल्याचे दिसून आले. हा व्हायरल व्हिडिओ @viralinsects नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.