(फोटो सौजन्य: X)
क्रिकेट हा खेळ जगभरात फार लोकप्रिय आहे. विशेष करून भारतात तर हा खेळ मोठ्या जल्लोषात खेळला जातो. क्रिकेट खेळाला देशभरात इतके मानले जाते की जेव्हाही आतंरराष्ट्रीय सामने होतात तेव्हा लोक भारताच्या विजयासाठी आरती आणि हवन करतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण देशातील प्रत्येक गल्लीबोळात क्रिकेट खेळताना दिसतो. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका गोलंदाजाची बॉलिंग अनोखी स्टाईल फार चर्चेत राहिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘बट्टा बॉल’चा ट्रेंड भारतात खूप दिवसांपासून सुरू आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गोलंदाजाने आधी उजवा हात फिरवला आणि नंतर डावा हात कमरेच्या मागे घेऊन बॉल फेकला. व्हिडिओतील बॉलरची अनोखी स्टाईल पाहून सर्वच आवाक् झाले आणि त्याची तुलना बुमराह-मलिंगासोबत करू लागले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात अनेक विचित्र क्रिया पाहिल्या आहेत, ज्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा सारख्या दिग्गजांची गणना केली जाते.
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र कृती पाहिली तर पाकिस्तानचा सोहेल तन्वीर हातासह खांदे फिरवून गोलंदाजी करायचा. मुथय्या मुरलीधरन, सुनील नरेनपासून ते अब्दुल कादिरपर्यंत त्यांच्या विचित्र गोलंदाजीमुळे चर्चेत होते. सामान्यतः वेगवान गोलंदाज उंच हाताच्या ॲक्शनने गोलंदाजी करतात, परंतु लसिथ मलिंगा राउंड आर्म ॲक्शनने गोलंदाजी करत असे. अशी कृती त्या काळात फारच विचित्र होती. मलिंगाने आयपीएलच्या इतिहासात 170 विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराह अजूनही खेळत आहे आणि त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 165 विकेट घेतल्या आहेत.
Pura batsman samaj dara hua h pic.twitter.com/DT5HkJ6KNA
— Kattappa (@kattappa_12) March 17, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @kattappa_12 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘संपूर्ण फलंदाज समुदाय घाबरला आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे काहीच नाही बॉलिंगमध्ये, अंडर आर्म बॉलिंगची परवानगी नसते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बॉलही फिरत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.