Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: मध्यरात्री मुली नेमकं काय मागवतात? डिलिव्हरी बॉयने केला खुलासा; ‘बेल मत बजाना प्लीज’ म्हणत व्हिडीओ व्हायरल!

Viral Video: मध्यरात्री भूक लागल्यानंतर अनेकजण ऑनलाईन ऑर्डरला प्राधान्य देतात. यामध्ये शक्यतो जेवण किंवा स्टार्ट पदार्थ मागवले जातात. मात्र सोशल मीडियावर एका डिलिव्हरी बॉयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मध्यरात्री मुली काय काय ऑर्डर करू शकतात, याचा खुलासा केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही पण डोक्याला हात लावाल....

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 12:48 PM
मध्यरात्री मुली नेमकं काय मागवतात? डिलिव्हरी बॉयने केला खुलासा; 'बेल मत बजाना प्लीज' म्हणत व्हिडीओ व्हायरल!

मध्यरात्री मुली नेमकं काय मागवतात? डिलिव्हरी बॉयने केला खुलासा; 'बेल मत बजाना प्लीज' म्हणत व्हिडीओ व्हायरल!

Follow Us
Follow Us:
  • रात्री २-३ वाजता मुलींच्या ऑनलाइन ऑर्डरचा भन्नाट किस्सा
  • डिलिव्हरी बॉयने सांगितले गुपित
  • व्हिडीओ पाहून डोक्याला हात लावाल…
Viral Video: अनेकजण मध्यरात्री भूक लागल्यानंतर ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपवरून काहीतरी ऑर्डर करतात. मध्यरात्री २ किंवा ३ वाजताही तरुण-तरुणी घरबसल्या आपल्या आवडीचे पदार्थ मागवतात. मात्र, मध्यरात्री ऑर्डर घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला ग्राहकांकडून कोणत्या खास सूचना दिल्या जातात, याचा कधी विचार केला आहे का? सध्या अशाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये डिलिव्हरी बॉयने मध्यरात्री ऑनलाइन ऑर्डर देणाऱ्या तरुणींच्या काही खास सवयींचा मजेशीर अंदाजात खुलासा केला आहे. त्याच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

IRCTC Food Controversy : रेल्वेच्या जेवणात निष्काळजीपणाचा कळस! डाळीत धातूचा तुकडा, व्हिडिओ व्हायरल होताच IRCTC कारवाई

मध्यरात्री मुलींकडून सर्वाधिक ऑर्डर?

इन्स्टाग्रामवरील @the_deliveryboy81 या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये संबंधित तरुण स्वतःला डिलिव्हरी एजंट असल्याचे सांगतो. मध्यरात्रीच्या वेळी सर्वाधिक ऑर्डर कोणाकडून येतात, याबाबत तो आपला अनुभव मजेशीर पद्धतीने सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा सर्वाधिक ऑर्डर तरुणींकडून येतात. विशेष म्हणजे, ऑर्डर देताना त्यांच्याकडून काही खास सूचनाही दिल्या जातात. या सूचना ऐकल्यानंतर अनेकांना हसू आवरणे कठीण होत आहे.

‘भैय्या, बेल मत बजाना प्लीज!’

या व्हिडीओमधील सर्वात मजेशीर भाग म्हणजे तरुणींकडून दिली जाणारी एक खास सूचना. डिलिव्हरी बॉयच्या म्हणण्यानुसार, एखाद्या तरुणीची ऑर्डर स्वीकारल्यानंतर लगेच त्याला मेसेज किंवा सूचना मिळते. ‘भैय्या, जेव्हा तुम्ही सोसायटीमध्ये याल तेव्हा मला फोन करा; पण घराची बेल वाजवू नका,’ अशी विनंती केली जाते. घरातील इतर सदस्यांना आपण मध्यरात्री काहीतरी ऑनलाइन मागवले आहे, हे कळू नये म्हणून ही खबरदारी घेतली जात असल्याचे तो मजेशीर अंदाजात सांगतो. विशेष म्हणजे, ही काही एखाद्या एकाच ग्राहकाची सूचना नसून अशा प्रकारची विनंती वारंवार केली जाते, असेही त्याने म्हटले आहे. प्रत्येक दुसऱ्या ऑर्डरमध्ये अशी सूचना मिळत असल्याचा त्याचा दावा आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओची जोरदार चर्चा

मध्यरात्री ऑनलाइन फूड ऑर्डर देण्याची सवय, घरच्यांना न कळता पदार्थ मागवण्याची युक्ती आणि डिलिव्हरी बॉयला दिल्या जाणाऱ्या सूचना यामुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. डिलिव्हरी एजंटच्या रोजच्या कामातील अशा मजेशीर अनुभवांमुळे ग्राहकांच्या वेगवेगळ्या सवयीही समोर येत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Nagaland Viral Video : चिमुकलीने गायले ‘जन गण मन’! मंत्र्यांची पोस्ट चर्चेत, व्हिडिओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

💡

Frequently Asked Questions

  • Que: सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ व्हायरल होत आहे?

    Ans: मध्यरात्री ऑनलाइन फूड ऑर्डर देणाऱ्या तरुणींच्या खास सूचनांबाबत एका डिलिव्हरी बॉयने बनवलेला मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • Que: मध्यरात्री ऑर्डर देताना तरुणी डिलिव्हरी बॉयला काय सांगतात?

    Ans: 'सोसायटीत आल्यानंतर फोन करा, पण घराची बेल वाजवू नका,' अशी सूचना अनेक तरुणी देत असल्याचे या डिलिव्हरी बॉयने व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

  • Que: हा व्हायरल व्हिडीओ कोणत्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहे?

    Ans: हा व्हिडीओ @the_deliveryboy81 या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.

Web Title: Viral delivery boy video midnight food orders girls secret no doorbell request sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

IRCTC Food Controversy : रेल्वेच्या जेवणात निष्काळजीपणाचा कळस! डाळीत धातूचा तुकडा, व्हिडिओ व्हायरल होताच IRCTC कारवाई
1

IRCTC Food Controversy : रेल्वेच्या जेवणात निष्काळजीपणाचा कळस! डाळीत धातूचा तुकडा, व्हिडिओ व्हायरल होताच IRCTC कारवाई

Nagaland Viral Video : चिमुकलीने गायले ‘जन गण मन’! मंत्र्यांची पोस्ट चर्चेत, व्हिडिओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल
2

Nagaland Viral Video : चिमुकलीने गायले ‘जन गण मन’! मंत्र्यांची पोस्ट चर्चेत, व्हिडिओ पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

Uganda Viral Video : ना महाराष्ट्र, ना भारत ! शिवरायांचा इतिहास पोहोचला युगांडात, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल
3

Uganda Viral Video : ना महाराष्ट्र, ना भारत ! शिवरायांचा इतिहास पोहोचला युगांडात, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL
4

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.