
Little girl sings national anthem ( लहान मुलगी राष्ट्रगीत गात आहे. )
नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री, टेमजेन इम्ना अलोंग यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे, “भारतीय असल्याचा यापेक्षा अधिक पुरावा तुम्हाला हवा आहे का?”
मिळालेल्या माहिती नुसार एक चिमुकली मुलगी माईक घेऊन एका मंचावर उभी आहे. तिने शाळेचा गणवेश घातला आहे. तिच्या मागे एक माणूस गिटार आणि माउथ ऑर्गन वाजवत आहे. ती मुलगी आत्मविश्वासाने आणि आदराने आणि निरागसतेने राष्ट्रगीत म्हणते आहे. तिचा आवाज स्पष्ट आणि भावपूर्ण आहे. “तव शुभ आशिष मांगे, गहे तव जयगाथा…” या गीताच्या ओळींनी प्रेक्षक भारावून जातात. हा कार्यक्रम “माझी अपंगता हीच माझी महाशक्ती” या संकल्पनेवर आधारित एका कार्यक्रमादरम्यान पार पडली.
आपल्या विनोदी आणि प्रेरणादायी सोशल मीडिया पोस्टसाठी ओळखले जाणारे मंत्री टेमजेन इम्ना अलोंग यांनी हा व्हिडिओ एक्स (X) वर शेअर केला.
इससे ज़्यादा सबूत चाहिए भारतीय होने का? https://t.co/CcGXNrHzbV — Temjen Imna Along (@AlongImna) November 3, 2026
त्यांनी या व्हिडिओला हिंदीमध्ये कॅप्शन दिले, “भारतीय असल्याचा यापेक्षा अधिक पुरावा तुम्हाला हवा आहे का?” हा प्रश्न ईशान्य भारतातील रहिवाशांना अनेकदा परदेशी समजणाऱ्या किंवा त्यांना चिनी किंवा नेपाळी म्हणून संबोधणाऱ्या लोकांना उद्देशून होता. मंत्र्यांचा संदेश स्पष्ट होता: देशभक्ती आणि भारतीयत्व कोणत्याही प्रदेशापुरते किंवा दिसण्यापुरते मर्यादित नाही.
सोशल मीडियावर या मुलीचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. लोकांनी त्या मुलीच्या आवाजाची, उच्चारांची आणि आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. अनेकांनी लिहिले की, इतक्या लहान वयात इतक्या अचूकतेने राष्ट्रगीत गाणे ही अभिमानाची गोष्ट आहे.
काही युर्जसच्या मते सांगण्यात येते की, हा व्हिडिओ राष्ट्रीय एकतेचा एक मजबूत संदेश देतो. ईशान्य भारतातील लोकांना सामोरे जाव्या लागणाऱ्या भेदभावावरही चर्चा झाली. लोकांनी म्हटले की, असे निरागस सादरीकरण आपल्याला आठवण करून देते की भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे.
Ans: आत्मविश्वासाने आणि सुरेल आवाजात भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' गायले आहे. त्यामुळे तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ans: नागालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री टेमजेन इम्ना अलोंग यांनी हा व्हिडिओ एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला.
Ans: 'भारतीय असल्याचा यापेक्षा अधिक पुरावा तुम्हाला हवा आहे का?' असे कॅप्शन दिले.