Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Italy Capri double waterspout : इटलीच्या समुद्रात घडली अद्भूत घटना, कॅमेऱ्यात कैद झाले दुर्मिळ ‘डबल वॉटरस्पाउट’, VIDEO VIRAL

Italy Capri double waterspout : इटलीच्या किनारपट्टीवर अद्भूत दृश्य पाहायला मिळाले आहे. इटलीच्या प्रसिद्ध कॅपरी बेटाजवळ समुद्राच्या पृष्ठभागावर एक अत्यंत दुर्मिळ 'डबल वॉटरस्पाउट' (जुळे जलस्तंभ) तयार झाला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 11, 2026 | 01:26 PM
Italy Capri double waterspout Rare waterspout Mediterranean Sea

Italy Capri double waterspout Rare waterspout Mediterranean Sea

Follow Us
Follow Us:
  • इटलीच्या किनारपट्टीवर अद्भूत दृश्य
  • नैसर्गिक खडांच्या पार्श्वभूमीवर घडलेली घटना
  • वैज्ञानिक कारण

निसर्ग हा नेहमीच आपल्या अफाट आणि गूढ रूपाने मानवाला थक्क करत असतो. सध्या जगभरातून एक अशीच अत्यंत विलोभनीय आणि दुर्मिळ घटना समोर आली आहे, जिने हवामान तज्ज्ञांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. इटलीच्या लोकप्रिय आणि सुंदर कॅपरी (Capri) बेटाजवळ समुद्राच्या वरच्या भागात एक अद्भूत ‘डबल वॉटरस्पाउट’ (Italy Capri double waterspout) म्हणजेच जुळे जलस्तंभ तयार झाले आहेत. ही एक प्रकारची पाण्याच्या चक्रीवादळासारखी नैसर्गिक रचना असते, जी आकाशातील काळ्या ढगांपासून थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत पोहोचते. या मनमोहक आणि तितक्याच थक्क करणाऱ्या दृश्याने सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला आहे.

 काय आहे ही ‘वॉटरस्पाउट’ नावाची नैसर्गिक घटना?

सर्वसामान्य भाषेत सांगायचे तर, वॉटरस्पाउट हे समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होणारे एक तीव्र स्वरूपाचे चक्रवात किंवा वारे असते, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण कमानीसारखे किंवा स्तंभासारखे वर उचगले जाते. इटलीच्या या घटनेमध्ये एक नाही, तर एकाच वेळी दोन वेगवेगळे पाण्याचे फिरणारे स्तंभ (Waterspouts) तयार झाले होते, म्हणूनच याला ‘डबल वॉटरस्पाउट’ म्हटले जात आहे. हे दोन्ही पाण्याचे प्रचंड स्तंभ बेटावरील अत्यंत प्रसिद्ध अशा ‘फॅराग्लिओनी’ (Faraglioni) नावाच्या नैसर्गिक खडकांच्या रचनेवरून जाताना स्पष्टपणे दिसून आले. आकाशात दाट जमलेले काळे ढग आणि त्याखाली समुद्रातून उसळणारे पाण्याचे हे दोन नागमोडी खांब पाहून स्थानिक नागरिकही अचंबित झाले.

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात नेमकं चाललंय काय? इम्रान खाननंतर आता माजी परराष्ट्रमंत्री कोसळले, हातांना आणि पायांना दुखापत

 हवामानातील बदलांमुळे घडली ही दुर्मिळ घटना

हवामान तज्ज्ञांच्या मते, भूमध्य समुद्राच्या (Mediterranean Sea) परिसरामध्ये उन्हाळ्याचा शेवट आणि शरद ऋतूच्या सुरुवातीच्या काळात अशा घटना घडणे सामान्य मानले जाते. जेव्हा अपेक्षाकृत थंड हवा पाण्याच्या तुलनेने उबदार असलेल्या समुद्रावर वाहू लागते, तेव्हा अनुकूल वातावरण तयार होते. यात प्रामुख्याने विरुद्ध दिशेने येणारे वारे एका विशिष्ट बिंदूवर एकमेकांशी जोरदार धडकतात, ज्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावर हवेचे वेगाने फिरणारे स्थानिक पट्टे तयार होतात. याच परस्परविरोधी वाऱ्यांच्या संघर्षातून हे जलस्तंभ समुद्राचे पाणी वेगाने वरच्या दिशेने ओढतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : North Korea : किम जोंग उनच्या घराण्यात मुलगी विरुद्ध बहीण; उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार?

 पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कॅपरी बेटावर थंडीत घडले विशीष्ट दृष्य

कॅपरी हे इटलीतील अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असून, दरवर्षी येथे जगभरातून सुमारे ३ दशलक्षाहून अधिक पर्यटक भेट देण्यासाठी येतात. हिवाळा किंवा पर्यटनाचा मोसम संपल्यानंतर या बेटावर बहुतांश नागरिक आणि स्थानिक रहिवासीच राहतात. त्यामुळे या निसर्गरम्य वातावरणात घडलेल्या या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार प्रामुख्याने तिथले स्थानिक्स बनले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये आणि कॅमेऱ्यात हे विलोभनीय दृश्य कैद केले असून, सध्या हे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. निसर्गाचे हे रौद्र आणि सुंदर रूप पाहून सगळेच जण थक्क झाले आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'डबल वॉटरस्पाउट' ही घटना कुठे घडली आहे?

    Ans: ही दुर्मिळ घटना इटलीच्या प्रसिद्ध कॅपरी (Capri) बेटाजवळील समुद्रात घडली आहे.

  • Que: वॉटरस्पाउट म्हणजे नेमके काय असते?

    Ans: वॉटरस्पाउट हा समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होणारा पाण्याच्या चक्रीवादळासारखा एक स्तंभ असतो, जो काळ्या ढगांपासून थेट पाण्यापर्यंत जोडलेला असतो.

  • Que: अशा प्रकारच्या नैसर्गिक घटना घडण्याचे कारण काय असते?

    Ans: समुद्रावरील उबदार पाण्यावर जेव्हा थंड वारे वाहतात आणि विरुद्ध दिशेचे वारे एका ठिकाणी आपटतात, तेव्हा हवेच्या चक्रामुळे ही रचना तयार होते.

Web Title: Italy capri rare double waterspout weather phenomenon hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • Italy
  • viral video
  • World news

संबंधित बातम्या

Board Exam 2027: 12वीच्या अकाउंटन्सी परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरता येणार? दिल्ली उच्च न्यायालयाची CBSE आणि केंद्र सरकारला नोटीस
1

Board Exam 2027: 12वीच्या अकाउंटन्सी परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरता येणार? दिल्ली उच्च न्यायालयाची CBSE आणि केंद्र सरकारला नोटीस

Strait of Hormuz : होर्मुझमधील 3 तेलवाहू जहाजांमध्ये प्रचंड स्फोट; इराणचे थेट भाष्य, ‘आमच्या मार्गात आलात तर…’
2

Strait of Hormuz : होर्मुझमधील 3 तेलवाहू जहाजांमध्ये प्रचंड स्फोट; इराणचे थेट भाष्य, ‘आमच्या मार्गात आलात तर…’

North Korea : किम जोंग उनच्या घराण्यात मुलगी विरुद्ध बहीण; उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार?
3

North Korea : किम जोंग उनच्या घराण्यात मुलगी विरुद्ध बहीण; उत्तर कोरियाच्या सत्तेची सूत्रे नेमकी कोणाच्या हातात जाणार?

Biryani Stall Dispute: बिर्याणी खायच्या आधीच स्टॉलवरून हरियाणात राडा; गोळीबार, दगडफेक अन्…; Video Viral
4

Biryani Stall Dispute: बिर्याणी खायच्या आधीच स्टॉलवरून हरियाणात राडा; गोळीबार, दगडफेक अन्…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.