हीच खरी श्रीमंती! कामावरुन परतेल्या वडीलांचे मुलीनं केलं गोड स्वागत, क्षणात थकवा गायब; VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अत्यंत हृदयस्पर्शी आहे.एका मुलीने आपल्या वडिलांचे खास स्वागत केले आहे. तरुणीचे वडील कामावरुन थकून घरी परतले होते. परंतु ते घरी येताच त्यांचा थकवा क्षणात गायब झाला आहे. त्यांचा लाडक्या मुलीने त्यांचे खास आणि गोड अंदाजात स्वागत केले आहे. यामुळे ते दिवसभराचा थकवा विसरले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन मुलींनी आपल्या वडीलांचे खास स्वागत केले आहे. तुम्ही व्हिडिओत पाहून शकता की, मुलींचे बाबा घरुन परतलेले असतात. दरावाजा उघडताच आपके आ जाने से गाणे सुरु होते. मुली त्यावर डान्स करु लागतात आणि त्यांचे वडीलही त्यांच्यासोबत ठुमका मारतात. तुम्ही पाहू शकता की, ते सुरुवातील आश्चर्यचकित झाले आहेत. पण आपल्या मुलींच्या चेहऱ्यावरील हास्य बघून त्यांच्याही चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली आहे.
बाप-लेकीची झाली शेवटची भेट! शाळेत सोडायला गेले अन् काळाने केला घाला, हृदयद्रावक VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
इंटरनेट की टॉक्सिसिटी के बीच ये वीडियो आपको भावुक कर देगा।
जैसे ही पिता घर आया बेटियों ने थके हारे पिता का ऐसा स्वागत किया कि सारी थकान दूर कर दी। #Daughters #Messi𓃵 pic.twitter.com/YyAbCx3SrF — अश्विनी सोनी (@Ramraajya) December 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ramraajya या अकाउंटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केले आहे. अनेक तरुणांनी त्यांनाही मुलगी हवी असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे डोळे पाणावले आहेत.
कौन हे ये लोग…! क्रिसमससाठी तरुणीने बनवली हटके हेअरस्टाईल; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






