
Child rescued from elevator shaft saved by security guard
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली बिल्डींगच्या परिसरात खेळत आहे. तिथेच एक लिफ्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्ट बंद आहे. लिफ्टचे दरवाजा ओपने आहे, तसेच केबिनही जाग्यावर नाही. यावेळी अचानक चिमुकली त्या लिफ्टकडे जाऊ लागते. ती अगदी लिफ्टच्या जवळ जात असते. हे दिसताच तिथे बसलेला वॉचमॅन तातडीने उठतो. चिमुकली लिफ्ट जवळ जाऊन तिचा तोल जाणार तेवढ्यात वॉचमॅन तिला उचलून बाजूल घेतो. यामुळे चिमुकलीचा जीव वाचतो. सुरक्षा कर्मचाऱ्याचे लक्ष नसते तर मोठा अनर्थ घडला असता. पण त्याच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचा जीव वाचला.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @gajabkiduniyaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी वॉचमॅनचे कौतुक केले आहे. तसेच अशा ठिकाणी लहान मुलांना एकटे न सोडण्याचा सल्ला दिला आहे. एका युजरने लिफ्ट ओपन कशी ठेवू शकतात असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एकाने हा एआय जनरेटेड व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. आणखी एका युजरने पण लिफ्ट का ओपन होती? असा प्रश्न केला आहे, तर वॉचमॅनच्या सतर्कतेला सलाम असेही म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.