
viral video
या तरुणीवर व्हिडिओ बनवण्याचे भूत सवार झाले असून तिने थेट किचन मध्ये ओट्यावर चढून रिल बनवली आहे. धक्कादायक बाबा म्हणजे एककीडे गॅसवर काम सुरु आहे आणि ही तरुणी किचन ओट्यावर चढून नाचत आहे. किचन अगदी छोट्या जागेत आहे. अशातच तरुणीसोबत गंभीर दुर्घटना घडली आहे. सुदैवाने जास्त मोठी हानी झाली नाही, परंतु थोडा जरी चुक झाली असतील तर किचनमध्ये मोठा स्फोट झाला असतात. यामुळे तरुणीचा जीव गेला असता.
व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, तरुणी कॅमेरा सेट करुन किचन ओट्यावर चढते आणि डान्स करु लागते. डान्स करताना तिचा पाय घसरतो आणि तरुणी खाली पडते. यावेळी गॅसवर ठेवलेल्या भाजीच्या पातेल्याला तिचा हात लागतो आणि भांडे खाली पडते. भाजी तिच्या अंगावर पडते, ज्यामुळे तिला चांगलेच भाजते. उकळतं अन्न तिच्या अंगावर सांडते. सध्या या घटनेचा भयावह व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @nehashakya706 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने, स्वत:च पडायचं नाटक केलेय असे कोणाला वाटतेय असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने ओव्हर अॅक्टिंग असे म्हणत हसण्याचा इमोजी शेअर केला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.