रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ही ट्रेन सुरक्षितपणे थांबण्यातही यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची जगातील सर्वात वेगवान सुपरकंडक्टिंग इलेक्ट्रिक मॅग्लेव ट्रेन मानली जात आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेन वाऱ्याच्या वेगाने झपतन गेली आहे. मागे केवळ हलका धूर दिसत आहे. एखाद्या चित्रपटातील क्षणासारखा दिसत आहे. ही ट्रेन सुपकंडक्टिंग मॅग्नेट्सच्या मदतीने ट्रॅकवर तंरगते. यामुळे ट्रेनचे घर्षण शून्य होते. यामुळे ट्रेन प्रचंड वेगाने प्रवास करते. तज्ज्ञांच्या मते, ही गती एवढी जबरदस्त आहे की याचा वापर रॉकेट लॉन्च करण्यासाठी देखील करता येतो.
धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क
व्हायरल व्हिडिओ
#China sets a world record with superconducting maglev train hitting 700 km/h in just 2 seconds!#technology #railway #train pic.twitter.com/kMVSAAwD36 — Shanghai Daily (@shanghaidaily) December 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या या ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. चीनच्या या प्रयोगाने जपानला मागे टाकले आहे. जपानकडे ६०० किमीच्या वेगाने धावणारी मॅग्लेव ट्रेन आहे. परंतु चीनने हा विक्रम मोडला असून सर्वजण आश्चर्यात पडले आहेत. गेल्या काही काळात चीन अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. यातील तंत्रज्ञान क्षेत्रात चीन अग्रगण्य होत चालला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. ट्रेन क्षणात नजरेआड झाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






