
accident viral video
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन व्यक्ती रस्त्याच्या कडेल उभे आहे. एक जण खड्डा खोदण्याचे काम करत आहे, तर दुसरा व्यक्ती रस्त्यावर पाणी मारत आहे. काही वेळ सर्व काही शांतच आहे. आसपास कोणताही गोंगाट नाही, गोंधळ नाही. रस्त्याच्या कडेला पाणी मारत उभा असलेला तरुणासोबत काही भयंकरच घडले आहे, ज्याचा तुम्ही-आम्ही त्या तरुणाने कोणीच विचार केला नाही.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की अचानक एका बाजूने वाऱ्याच्या वेगात कार येत आणि पाणी भरत असलेल्या तरुणाला जोरदार धडक देते. यामुळे तरुण हवेत उडून लांब जाणून पडतो. हे पाहून तिथेच असलेल्या दुसऱ्या तरुणाला सुरुवातील काय घडले हे लक्षात येत नाही. तो तेथून बाजूला पळून जातो. पण त्याच्या लक्षात येताच आपल्या मित्राकडे तो धाव घेतो. हा क्षण इतका भयंकर होता की, अंगावर शहारे उभे राहतील. सध्या या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
#Maharajganj, UP 🚨⚠️ Disturbing Visuals🚨 What’s with Swift Dzire? Driver Intoxicated? @DriveSmart_IN @dabir @InfraEye @sss3amitg pic.twitter.com/vnTFtEX0Ec — Dave (Road Safety: City & Highways) (@motordave2) December 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @motordave2 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांचा हा व्हिडिओ पाहून थरकाप उडाला आहे. एका युजरने काळाने घात केला त्याचा असे म्हटले आहे , तर दुसऱ्या एका युजरने बेपर्वा चालकांमुळे निरापराध लोकांचा जीव जातो असे म्हटले आहे. ही घटना गोरखपूर-सोनौली राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याची माहिती मिळाली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.