Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karwa Chauth Viral Video : सात जन्माची साथ, अन् पतीच्या गळ्यात लाथ; या भलत्याच करवां चौथची देशभर चर्चा

Karwa Chauth Viral Video : करवा चौथच्या दिवशी पत्नीने पतीच्या मानेभोवती पाय ठेवून अनोख्या पद्धतीने उपवास सोडला. पती-पत्नीचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 10, 2026 | 06:34 PM
Karwa Chauth Viral Video : सात जन्माची साथ, अन् पतीच्या गळ्यात लाथ; या भलत्याच करवां चौथची देशभर चर्चा

Karwa Chauth Viral Video : सात जन्माची साथ, अन् पतीच्या गळ्यात लाथ; या भलत्याच करवां चौथची देशभर चर्चा

Follow Us
Follow Us:
  • पती-पत्नीच्या भन्नाट व्हिडिओची देशभर चर्चा
  • असा करवा चौथ केव्हाच पाहिला नसेल
  • नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिय
 

सध्या एक करवा चौथचा (Karwa Chauth Viral Video) मजेशीर व्हिडिओ देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे, या पती-पत्नीचा व्हिडिओ इतका गंमतीशीर आहे की, युजर्सही त्याचा चांगला आनंद घेत आहेत. हा व्हिडिओ पाहून आपणही प्रसिद्धीसाठी हे काय सुरू आहे बाबा असं म्हणतं डोकं धराल.

 २९ ऑक्टोबरला देशभरात प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यात करवा चौथ साजरा केला जातो. पतीच्या दिर्घायुष्यासाठी हा उपवास धरला जातो. यावेळी बायका उपवासादरम्यान पाणीही पित नाहीत. अशात एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओत करवा चौथची प्रथा एक वेगळ्याचं अंदाजात पार पडत असल्याचे दिसत आहे. आता तो व्हिडिओ पाहून हसावं की, रडावं हा ज्याचा त्याचा प्रश्न बुवा. आपलं काम तुम्हाला त्या व्हिडिओपर्यंत नेणं.

एक पाय पतीच्या मानेत अन्…

हा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात एक जोडपं करवा चौथ करताना दिसत आहे. एक भन्नाट संकल्पना या जोडप्याला सुचली, जी पाहून तुम्ही मनं मोकळं करून हसाल. त्याचं झालं असं की, उपवास सोडताना पत्नीने असा काही स्टंट केला की, बाबो, ते पाहून अनेक जण थक्क झालेत. हा व्हिडिओ सध्या भलत्याच ट्रेंडिंगला आहे.

Viral Video: लॅपटॉपवर काम करून मान दुखू लागली; उपचाराऐवजी CA पोहोचली जपानला, उशीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

अशा प्रकारे सोडला उपवास

व्हायरल व्हिडिओत असं पाहण्यास मिळते की, एक महिला चाळणीत दिवा घेऊन पतीच्या एका पायावर उभी आहे. या काळात ती आपला एक पाय पतीच्या माने भोवती व दुसरा पाय पतीच्या मांडीवर ठेवत बॅलन्स करते.

आश्चर्याची गोष्ट अशी की, हे सर्व करताना ती जराही डगमगत नाही. रोजची प्रॅक्टीस असावी बुवा. तिचं हे कलाकौशल्य लोकांना आवडलेही व काही जणांनी डावललेही. तसं बघा, याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टीकोन असू शकतो. त्याला आपण काय करणार…

या व्हिडिओत असंही पाहण्यास मिळते की, महिला हा स्टंट करताना अगोदर चंद्राचं दर्शन घेते, मग आपल्या पतीरायाचं. तिचा हा उपवास सोडण्याचा अंदाज खरंच कौतुकास्पदच म्हणावा लागेल.

पतीलाही १०० गुण द्यावे लागतील

 

मुळात ही संकल्पना पतीची की, पत्नीची याचा अंदाज बांधता येत नाही, मात्र अशाप्रकारचा व्हिडिओ साकारताना पतीने ज्याप्रकारे आपल्या पत्नीला साथ दिली आहे, ते खरंच वाखाण्याजोग आहे. हा व्हिडिओ तेवढा मजेशीरही आहे व पती-पत्नीमधील बॅलेंसिग संसाराचं एक जितं जागतं उदाहरणही…

Odisha Viral Video : जंगली हत्तीशी पंगा घेणं पडलं महागात? शेपटी ओढली, सोंडेला हात लावला; VIDEO व्हायरल

नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

 

आता अशाप्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून आयतं खाऊ समोर आल्यावर गप्प बसतील ते नेटिझन्स कुठले. मग भावांनी सुरू केल्या भन्नाट प्रतिक्रिया. त्यातील एक महाशय म्हणतो की, स्त्री आहे, ती काहीही करू शकते, तर दुसरा म्हणतो की, पतीचा अखेरचा करवा चौथ. आणखीन एक जण असं लिहितो की, हे पाहूण चंद्रही आकाशात लपून बसला. दरम्यान, काहीही असो पण अनेक जण हा व्हिडिओ वारंवार पाहत असल्याचे समोर येत आहे.

Web Title: Karwa chauth viral video wife stunt husband funny video rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • karwa chauth
  • viral video
  • Women

संबंधित बातम्या

Viral Video: लॅपटॉपवर काम करून मान दुखू लागली; उपचाराऐवजी CA पोहोचली जपानला, उशीची किंमत ऐकून व्हाल थक्क!
1

Viral Video: लॅपटॉपवर काम करून मान दुखू लागली; उपचाराऐवजी CA पोहोचली जपानला, उशीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Odisha Viral Video : जंगली हत्तीशी पंगा घेणं पडलं महागात? शेपटी ओढली, सोंडेला हात लावला; VIDEO व्हायरल
2

Odisha Viral Video : जंगली हत्तीशी पंगा घेणं पडलं महागात? शेपटी ओढली, सोंडेला हात लावला; VIDEO व्हायरल

Amravati Viral Video : साधी रिक्षा,पण इंग्रजी एकदम भारी! अमरावतीच्या काकांची सोशल मीडियावर हवा
3

Amravati Viral Video : साधी रिक्षा,पण इंग्रजी एकदम भारी! अमरावतीच्या काकांची सोशल मीडियावर हवा

Father Gifts BMW to Son : मुलाच्या यशाचा जल्लोष! नववीच्या परीक्षेत चमकला, वडिलांनी गिफ्ट केली कोट्यवधींची BMW
4

Father Gifts BMW to Son : मुलाच्या यशाचा जल्लोष! नववीच्या परीक्षेत चमकला, वडिलांनी गिफ्ट केली कोट्यवधींची BMW

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.