
china viral video
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @viewsmedia.ng या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महिनेले ड्रेनजच्या सहाय्याने बिल्डिंगमधून आणि खिडक्यांना लटकत खाली उतरली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला खिडक्यांच्या सळ्यांना पकडून बिल्डिंगला लटकलेली दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून महिलेच्या जीवघेण्या प्रयत्नांवर चर्चा सुरु आहे. एका युजरने नक्कीच ती बायकोची बेस्ट फ्रेंड असणार असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने 5 मिनिटांच्या आनंदासाठी जीव धोक्यात घालणं एवढं सोपं आहे का? असा प्रश्न केला आहे. तर तिसऱ्या एकाने हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या बायकोला नक्कीच कळणार, नाही का? असा प्रश्न केला आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.