Viral Stunt Video young boy injured while performing bike stunt on Delhi Gurugram express highway video goes viral
अलीकडे सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार वाढत चालले आहे. यामध्ये सर्वात जास्त तरुण आणि तरुणींचा समावेश असून हे लोक नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटना देखील घडल्या आहेत. लोक अतिशय धोकादायक आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून स्टंट करताना दिसत आहेत. स्टंट यशस्वी ठरल्यास व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळतात, परंतु स्टंट फसला तर यामुळे जीवाला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते.
सध्या असाच एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवर एका तरुणाला बाईक स्टंट करणे चागलेच महागात पडले आहे. तरुणाचा स्टंट असा फसला की यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण हायवेवर गाड्यांची रहदारी सुरु असताना बाईक स्टंट करताना दिसत आहे.
व्हिडिमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण बाईक चालू करुन त्यावर उभा राहिलेला आहे. तरुणाने हॅंडल सोडून बाईकवर उभे राहून स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. स्टंट करताना अचानक तरुणाचा तोल जातो आणि तरुण जोरात रस्त्यावर कोसळतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, याच वेळी काही गाड्या त्याच्या बाजून जाताना दिसत आहेत. तरुण बाईकवरुन जोरात कोसळ्याने त्याला गंभीर दुखापत होते. याच वेळी त्याचे मित्र याचा व्हिडिओ बनवत असतात. तरुण खाली पडताच ते त्याच्याकडे धाव घेतात. मिळाले्या माहितीनुसार, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Highways are really not meant for biker stunts. A biker injured at #Delhi #Gurgaon #Gurugram border while performing a stunt. Such stunt men and overspeeding #BIKERS are becoming regular menace on Expressway.#BreakingNews #TrendingNow #ViralVideos #viralvideo pic.twitter.com/VZCXvynDAF
— Sumedha Sharma (@sumedhasharma86) April 28, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sumedhasharma86 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “याच्या अंगात जास्तच मस्ती आहे.” तर दुसऱ्या एका युजरने “का असे जीवघेणे कृत्य करतात लोक असा प्रश्न विचारला आहे.” परंतु या व्हिडिओवरुन लक्षात घेणे महत्वाचे आहे की, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी असे धोकादायक स्टंट करणे कितपत योग्य आहे. यामुळे आपलाही जीव धोक्यात येऊ शकतो, तसेच आपल्यामुळे इतरांनाही दुखापत होण्याची शक्यता आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.