Pahalgam Terror Attack: काश्मीरी मुलाची माणुसकी; पहलगाम हल्ल्यादरम्यान वाचवला चिमुकल्याचा जीव, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जम्मू आणि काश्मिरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांवर हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्टकांना गोळीबार केला. यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळात आहेत. हल्ल्यामध्ये आपले प्राण वाचवताना, हल्ला होताना, तसेच मत शरीरांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्याने संपूर्ण देशात दुखाचे आणि संतापाचे वातावरणे आहे. याच दरम्यान आणखी एक व्हिडिओ सोशल मीडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओतून माणूसकी अजूनही जिंवत असल्याचे दिसून येते. यामध्ये हल्ल्यादरम्यान गोळीबार सुरु अस,ताना एक लहान काश्मिरी मुलगा एका चिमुकल्याला उचलून घेऊन जाताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हल्ल्यामुळे लोक घाबरलेले दिसत आहेत. तसेच गोळीबाराचा आवाजही येते आहेत. याच वेळी एक काश्मिरी मुलगा एका चिमुकल्याला कडेवर घेऊन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ हल्ल्यानंतरचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज येत आहे. तसेच काश्मिरी मुलागा, मी येतोय, काळजी करु नका असे म्हणत आहे. याशिवाय एक महिला ओरडत असल्याचेही व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. व्हिडिओवरुन लक्षात येते की, हल्ल्याच्या वेळी लोक पूर्णपणे घाबरलेले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअक केला जात आहे. व्हिडिओतील मुलाचे भरभरुन कौतुक केले जात आहे. तसेच अनेकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
A Kashmiri boy carried a tourists small baby in his Arms and saved him during the Phalgam attack. But no media will show it .#PahalgamTerrorAttack pic.twitter.com/Y58VuV5UhU
— 🎀🎀. (@Kaakazkyom) April 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Kaakazkyom या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी त्या लहान मुलाचे कौतुक केले आहे. हल्ल्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेकांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. याच वेळी भारत सरकारने दहशतवाद्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कारवाई सुरु केली आहे. 9 दहशतवाद्यांची घरे उद्धवस्त करण्यात आली आहेत. तसेच या हल्ल्याची जबाबादीर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना ल्ष्कर-ए-तैयबा म्हणजेच द रेझिस्टंट फ्रंट ने घेतली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.