viral stunt video young man's stunt of jumping from a moving train to another train video goes viral
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायाला मिळतात. जुगाड, डान्स, भांडण, स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. अलीकडच्या काही काळात स्टंटचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. लोकांना आपल्या जीवाचा कोणतीही पर्वा राहिलेली नाही. अनेकदा असे भयावह स्टंट व्हिडिओ पाहायला मिळतात की, पाहून अंगावर काटा येईल. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा अंगवार काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका तरुणाने धावत्या ट्रेनमध्ये एक धोकादायक स्टंट केला आहे. यामुळे त्याचा जीवही गेला असता. मात्र त्याला कसलीच पर्वा नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावत आहे. याचवेळी त्याच्या दुसऱ्या बाजून आणखी एक ट्रेनही वाऱ्याच्या वेगाने धावताना दिसत आहे. तसेच अनेक प्रवासी ट्रेनच्या दरवाज्यात थांबलेले दिसत आहे. यामध्ये कोणचा तोल गेला तर गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही ट्रेन धावत असताना रेल्वे ट्रॅकच्या मध्ये लावलेले खांबही येत आहे. याच वेळी एक तरुण एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये उडी मारतो. त्याची ही चूक त्याला महागातही पडली असते. त्याचा तोल गेला असता किंवा अचानक तो मध्ये येणाऱ्या खांबाला धडकला असता तर त्याचा जीवही गेला असता.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghantapin या अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊ नक्कीच बिहारी असणार, तर दुसऱ्या एका युजरने ही घटना खूप भयंकर आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका युजरने भाऊ, यमराचा मित्र आहे वाटतं असे म्हटले आहे. तर अनेकांनी असे स्टंट करण्याचा सल्ला दिला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.