अमानवीय कृत्य! मालकाने श्वानाला ट्रेनमधून बाहेर फेकलं अन्...; VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ तर कधी मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आपला राग अनावर होतो. अलीकडे प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. कधी गोंडस असे तर कधी क्रूर असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये गायी, म्हशी, कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी लोक पाळतात. पण अनेकदा त्यांचा संभाळ करत नाहीत.
सध्या असाच एक अमानवीय, क्रूरतेचा कळस असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या श्वानाला ट्रेनमधून बाहेर फेकून दिले आहे. त्याचे हे कृत्य पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन रेल्वे ट्रॅकवरुन धावत आहे. याचवेळी ट्रेन प्लॅटफॉर्मच्या जवळ येत असते. यादरम्यान एक व्यक्ती ट्रेनच्या दरवाज्यात येतो. त्याच्यासोबत श्वानाचे एक पिल्लू असते. तो ट्रेन हळू होतोच श्वानाला ट्रेनमधून बाहेर फेकून देतो. यानंतर श्वान मालकाकडे जाण्यासाठी ट्रेनमागे धावू लागते. मात्र मालकाला काहीही वाटत नाही. तो त्याला वाचवण्यासाठी काहीही करत नाही. मालक श्वानासोबत अगदी वाईट पद्धतीने वागतो. या व्हिडिओवरुन लक्षात येते की, माणूस किती क्रूर होत चालला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @joyfuse_009 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी म्हटले आहे की, मुक्या जीवाला पाळता येत नसेल तर पाळू नये, तर दुसऱ्या एका युजरने त्या माणसावर कारवाई करण्यात यावी असे म्हटले आहे. एका युजरने किती निर्दयी माणूस आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने त्याला त्याच्या कर्माचे फळ नक्की मिळेल असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.