Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेन खाली आलेल्या तरुणाचे जवानाने वाचवले प्राण, पाहा व्हिडीओ

सध्या अपघातांच्या अनेक घटना समोर येत आहेत. या घटनांचे थरारक व्हिडीओ देखील सोशल मी़डियावर पाहायला मिळतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पण ते म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नव्हती असा काहीसा प्रकार घडला आहे. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याच्या बुद्धीमत्तेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 02, 2024 | 04:24 PM
चालत्या ट्रेन खाली आलेल्या तरुणाचे जवानाने वाचवले प्राण

चालत्या ट्रेन खाली आलेल्या तरुणाचे जवानाने वाचवले प्राण

Follow Us
Follow Us:

सध्या अपघातांच्या अनेक घटना समोर येत आहेत. या घटनांचे थरारक व्हिडीओ देखील सोशल मी़डियावर पाहायला मिळतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पण ते म्हणतात ना काळ आला होता पण वेळ नव्हती असा काहीसा प्रकार घडला आहे. मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर पोलीस कर्मचाऱ्याच्या बुद्धीमत्तेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे पाहिल्यानंतर सर्वजण पोलिस कर्मचाऱ्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.

नेमकं काय घडलं? 

मीडिया रिपोर्टनुसार, गोरेगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. जिथे एक व्यक्ती चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान तोल गेल्याने तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये पडला. त्याला जवळपास ट्रेनची धडक बसली. तेवढ्यात मुंबई पोलीस हवालदार बाळासो ढगे यांनी तत्काळ त्या व्यक्तीकडे धाव घेत त्याला सुखरूप बाहेर काढले. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले इतर लोकही मदतीसाठी जमा झाले. कॉन्स्टेबल बाळासो ढगे यांनी आपले शौर्य दाखवून तरूणाचे प्राण वाचवले. मात्र, ते ऑफ-ड्यूटीवर होते. पण त्यांनी ही व्यक्ती अडचणीत असल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ मदत केली.

या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना मुंबई पोलिसांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “मुंबईकर सदैव कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर! घरी परतत असताना पीसी बाळासो ढगे यांना गोरेगाव रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये एक माणूस अडकलेला दिसला. “परिस्थितीवर तात्काळ प्रतिक्रिया देऊन, ढगे यांनी अपघात टळला आणि त्या व्यक्तीचे प्राण वाचवले.” हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकजण कॉन्स्टेबलचे कौतुक करत आहेत.

हे देखील वाचा – अरेच्चा! चोराने घरात येऊन जेवण केले, साफसफाई केली अन्…; मालकही हैराण

व्हायरल व्हिडीओ 


कॉन्स्टेबलचे कौतुक 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mumbaipolice च्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत अनेकांनी लाईक करून शेअर केले आहे. या व्हिडीओवर युजर्सने आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘एकदा पोलिस. नेहमीच पोलिस. ऑन ड्युटी असो वा ऑफ ड्युटी, त्याला त्याचे कर्तव्य माहीत असते. याचा अर्थ प्रत्येकाचे रक्षण करणे.’ तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘कॉन्स्टेबलला त्यांच्या शौर्याबद्दल आणि वेळीच बचाव कार्यासाठी पुरस्कृत करणे आवश्यक आहे! जय मुंबई पोलीस दल!’ तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, “मुंबई पोलीस हे एकेकाळी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम पोलीस होते यात शंका नाही.” व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोकांनी पोलिस कर्मचाऱ्याचे भरभरून कौतुक केले आहे.

Web Title: Viral video a constable saves the life of a man who got stuck in between train and a platform video goes viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 04:20 PM

Topics:  

  • Mumbai
  • viral video

संबंधित बातम्या

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन
1

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण
2

GSB Ganeshotsav 2026: जीएसबी महागणपतीचा शाही थाट! ६६ किलो सोने, ३३५ किलो चांदी अन् ७०३ कोटींचे विमा संरक्षण

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता
3

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका
4

FDA News: खवय्यांनो सावधान! गटाराशेजारी समोसे, स्वयंपाकासाठी अनफिल्टर्ड पाणी! मालाडमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर FDA चा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.