कुत्र्याच्या पिल्लाला रेल्वे ट्रॅकवर बांधले
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. अनेकदा इतके धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात की संताप येतो. अनेकदा असा विचार मनात येतो की, लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही. असे रील्स आपल्या नैतिक जबाबदारीवर अनेकदा प्रश्न उपस्थित करतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने हे प्रश्न अधिकच गडद केले आहेत. ज्यामध्ये एका निष्पाप पिल्लाला ट्रेनच्या ट्रॅकवर बांधले गेले आहे.
एका कुत्र्याच्या पिल्लाचा गळा ट्रॅकला बांधून ठेवला आहे. या कुत्र्याचे हे हाल कोणी केले असेल? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांना राग आणि दुःख दोन्हीही वाटत आहेत. त्याची अवस्था कोणाच्याही मनाला धडकी भरवणारी आहे. ज्याने हे कृत्य केले असेल त्याला शोधून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वांनी केली आहे. सोशल मीडियावर या घटनेवर लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पिल्लाला रेल्वे रूळावर कापडाने बांधून ठेवले
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाला रेल्वे रूळावर कापडाने बांधून ठेवले आहे. त्याचा गळा आणि पाय बांधण्यात आला आहे. ते अगदी तडफडत आहे. तेवढ्याच एक व्यक्ती तिथे येतो आणि त्याला सोडवतो. व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे की, त्याला सोडवल्यानंतर ते खूप आनंदी झाले होते. इकडे तिकडे उड्या मारत होते. लोकांनी त्याला सोडवणाऱ्याचे कौतुक केले आहे. अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल व्हिडीओ
नेटकरी संतापले
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sach.insharma6042 अकाऊंटवरून शेअर केला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रीया व्हिडीओवर दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या घटनेची सरकार आणि प्रशासनाकडून सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेक प्राणी संघटना या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत. प्राणी हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या घटनेने केवळ प्राण्यांच्या हक्कांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.