भर वर्गात दोन शिक्षिकांमध्ये जोरदार भांडण
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर हसू आवरता येत नाही. तुम्ही भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.
कारण व्हिडिओमध्ये दोन शिक्षिका जोरात भांडण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आई नंतर शिक्षक हा विद्यार्थ्यासाठी गुरूच्या स्थानी असतो. शिक्षकच विद्यार्थ्याच्या जीवनाला एका योग्य वळण देण्यसाठी मार्गदर्शन करतात. पण जेव्हा शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर चुका करत असतील तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल. विद्यार्थी शिक्षकांकडून काय शिकतील. असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यावर मनात येतो.
एकमेकींच्या झिंझ्या उपटत जोरदार भांडण
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन शिक्षिका एकमेकींना मारत, केसं ओढत, बोचकरत भांडण करत आहेत. वर्गात अनेक विद्यार्थी दिसत आहेत. एक सर त्यांची भांडणे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्गाच्या बाहेर विद्यार्थी घोळका करून उभे आहेत. ते त्यांचे भांडण बघत आहेत. दोन शिक्ष त्यांचे भांडण थांबण्याचा प्रयत्न करत असून पण दोन्ही शिक्षिका जोरदार भांडण करत आहेत. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये असणाऱ्या शिक्षिकेने अचानक भांडणाला सुरूवात केली होती. मात्र अद्याप हे भांडण कोणत्या कारणांवरून झाले हे लक्षात आले नाही.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर yadav2398paro या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ही नक्कीच सरकारी शाळा असेल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मुलांचे भविष्य बुडाले अशा शिक्षिका मिळाल्यामुळे, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की,त्या सरांमुळे मारामारी होत असणार. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मुलांचे भविष्य धोक्यात आहेत. हा व्हिडिओ कुठल्या शाळेचा आहे हे अद्याप कळालेले नाही.