चोरी करणे चोरट्यांना महागात पडले; मालकाने केली बेदम मारहाण
अलीकडे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लोक दिवसाढवळ्या चोरी करू लागले आहेत. सध्या असाच एक चोरीशी संबंदित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मालकाने चोरांना चांगलाच धडा शिकवला आहे. चोरीच्या घटनांमुळे लोक अनेकदा घाबरतात. अनेक वेळा हे चोरटे अतिशय धोकादायक गुन्हेही करतात. चोरी करून पळून जाताना वाटेत येणाऱ्याला मारून ते पळून जातात. अशा परिस्थितीत लोक चोरांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत घेतात आणि त्यांची तक्रार करतात. असा प्रश्न बराच काळ अनुत्तरीत राहतो.
सध्या चोरीशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून लोकांना धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियामुळे अपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल होत आहे. मालकाने चोराला चांगलीच अद्दल घडवली आहे. अनेकांनी या व्हिडीओचा आनंद लुटला आहे.
हे देखील वाचा- लहान मुलीसोबत भूताला प्रॅंक करणे पडलं महागात; क्षणात उलटला डाव, व्हिडीओ व्हायरल
चोरी करणे चोरट्यांना महागात पडले
वास्तविक, दोन चोरांचे नशीब इतके खराब होते की त्यांनी चुकीच्या घरात चोरी करण्याचा निर्णय घेतला. ते ज्या घरात चोरी करण्यासाठी गेले होते त्या घरात राहणाऱ्या मुलाने चोरट्यांना पकडले आणि नंतर त्याने एकट्याने दोन्ही चोरट्यांना बेदम मारहाण केली. चोर देखील मालकाला मारण्याच प्रयत्न करतात. पण त्याला काही होत नाही. उलट मालक त्यांना अजून मारायला लागते. या घरातून चोरी करून मोठी चूक केल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलाने त्या चोरट्यांनाही पळून जाऊ दिले नाही आणि खोलीत कोंडून त्यांना मारले. चोरट्यांनी दरवाजा उघडून पळ काढताच तो मुलगा त्यांच्या मागे धावला आणि एका चोरट्याला त्याच्या खोलीत ओढून नेला. त्यानंतर त्यांने पुन्हा चोरट्याला बेदम मारहाण केली. मुलाने चोराला मारहाण करून अर्धमेले करून सोडले.
व्हिडिओ व्हायरल
Two thieves break into a house, and this guy ends up inviting them back in to continue beating them. pic.twitter.com/8oFGD8SzjX
— Idiots Caught In Camera (@IdiotsInCamera) August 11, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा मुलगा चोरांशी लढताना पाहून असे वाटते की हा मुलगा संरक्षणात काम करतो कारण असे प्रशिक्षण फक्त संरक्षणात दिले जाते. या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल साइट X वर @IdiotsInCamera नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत 14 लाख लोकांनी पाहिली आहे आणि 66 हजार लोकांनी लाईक केली आहे. अनेकांना यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हणले आहे की, ‘आता त्यांना चांगलीच अद्दल घडली असेल. पुन्हा कधी आयुष्यात चोरी करण्याचा विचार देखील करणार नाहीत.’ तर आणखी एका युजरने म्हणले आहे की भाऊ, चोरट्यांना तर सगळं खानदान आठवले असेल’